"या सगळ्या अफवा...", सारा अली खानसोबत अफेयर्सच्या चर्चांवर रुमर्ड बॉयफ्रेंडने सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 11:43 IST2025-01-24T11:40:33+5:302025-01-24T11:43:35+5:30

सारा अली खान (Sara Ali Khan) बॉलिवूड इंडस्ट्रीतील आघाडीची नायिका आहे.

bollywood actress sara ali khan rumoured boyfriend arjun pratap bajwa break silence on their dating | "या सगळ्या अफवा...", सारा अली खानसोबत अफेयर्सच्या चर्चांवर रुमर्ड बॉयफ्रेंडने सोडलं मौन

"या सगळ्या अफवा...", सारा अली खानसोबत अफेयर्सच्या चर्चांवर रुमर्ड बॉयफ्रेंडने सोडलं मौन

Sara Ali Khan:  सारा अली खान (Sara Ali Khan) बॉलिवूड इंडस्ट्रीतील आघाडीची नायिका आहे. 'केदारनाथ' या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. त्यानंतर तिने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. दरम्यान, सारा अली खान तिच्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत आहे. अलिकडेच इंडस्ट्रीत अभिनेत्रीकार्तिक आर्यनला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु काही कारणांमुळे त्याचं ब्रेकअप झालं. त्यानंतर आता सारा अली खान एका पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. मागील काही दिवसांपासून कलाविश्वात अभिनेत्री अर्जुन प्रताप बाजवाला डेट करत असल्याच्या अफवा वाऱ्यासारख्या पसरल्या. त्यावर आता सारा अली खानचा रुमर्ड बॉयफ्रेंड अर्जुन प्रताप बाजवाने भाष्य केलं आहे. 

दरम्यान, अर्जुन प्रताप बाजवाने सारा अली खानसोबतच्या नात्यावर भाष्य केलं आहे. एका मुलाखतीमध्ये त्याने या अफवांचं खंडण करत मौन सोडलं. त्यावेळी अर्जुन म्हणाला, "चर्चा करणं हे लोकांचं काम आहे. मी माझ्या कामावर लक्ष देतो. या सगळ्या अफवा आहेत. मला यामुळे काहीच फरक पडत नाही." असं खुलासा अर्जुनने केला. सारा अली खान आणि अर्जुन प्रताप बाजवा यांचे केदारनाथ येथील  एक फोटो वेगाने व्हायरल झाला. या फोटोमध्ये ते दोघेही एकत्रित दर्शन घेताना दिसले. त्यानंतर अभिनेत्री अर्जुनला डेट करत असल्याची सर्वत्र चर्चा होऊ लागली. 

कोण आहे अर्जुन प्रताप बाजवा?

अर्जुन प्रताप बाजवा हा पंजाबमधील राजकीय नेते फतेह जंग सिंह बाजवा यांचा अर्जुन हा मुलगा आहे. फतेह जंग सिंह हे सध्या पंजाबमधील भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आहेत. त्याचबरोबर अर्जुन हा एक प्रसिद्ध अभिनेता आणि मॉडेल सुद्धा आहे. 

सारा अली खानचा ‘स्काय फोर्स’हा  चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासह वीर पहारिया, अक्षय कुमार आणि निम्रत कौर यांच्या प्रमुख भूमिका आहे. हा चित्रपट आज २४ जानेवारी २०२५ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.

Web Title: bollywood actress sara ali khan rumoured boyfriend arjun pratap bajwa break silence on their dating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.