बढिया मम्मी...! सारा अली खानने दणक्यात साजरा केला आईचा वाढदिवस; खास पोस्टने वेधलं सगळ्यांचं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 11:09 IST2025-02-10T11:06:19+5:302025-02-10T11:09:21+5:30
बढिया मम्मी...! अमृता सिंग यांचा जुना फोटो शेअर करत सारा अली खानने शेअर केली सुंदर पोस्ट

बढिया मम्मी...! सारा अली खानने दणक्यात साजरा केला आईचा वाढदिवस; खास पोस्टने वेधलं सगळ्यांचं लक्ष
Sara Ali Khan: अभिनेता सैफ अली खान Saif Ali Khan) व अमृता सिंग (amruta Singh) यांची लेक सारा अली खानने (Sara Ali Khan) आज बॉलिवूडमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सारा अली खान हे नाव आता बॉलिवूड इंडस्ट्रीपुरत मर्यादित राहिलेलं नाही. आपल्या अभिनाच्या जोरावर तिने जगभरात लाखो चाहते निर्माण केले आहेत. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या केदारनाथ चित्रपटामधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्रीने शेअर केलेली एक पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. आई अमृता सिंगच्या वाढदिवसानिमित्त साराने तिला हटके अंदाजात शुभेच्छा देत इन्स्टाग्रामवर सुंदर अशी पोस्ट शेअर केली.
आपल्या आईचा वाढदिवस खास पद्धतीने साजरा करण्यासाठी तिने काही अनसीन फोटो शेअर केल्याचे पाहायला मिळतायत. ९ फेब्रुवारीच्या दिवशी तिने आईचा वाढदिवस दणक्यात साजरा केल. हे फोटो आता इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. पहिल्या फोटो हा तिच्या लहानपणीचा त्यामध्ये सारा तिच्या आईसोबतचा दिसते आहे. तर दुसऱ्या फोटो हा अमृता सिंग यांच्या तरुणपणाचा आहे. सध्या हे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेत.
सोशल मीडियावर हे फोटो शेअर करत सारा अली खानने तिची आई अमृता यांच्यासाठी एक लांबलचक नोटही लिहिली आहे. काल त्यामध्ये तिने लिहिलंय की, "वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मम्मी जान..., मला तुझ्यासोबतची ती संध्याकाळ आठवते आणि मला तेव्हा तुझे कानातले आणि कुर्ता खूप आवडायचा आणि आता मी तुझ्या वाढदिवशी तुझी कॉपी केली आहे. #CarbonCopy #CopyPaste, बढिया मम्मी...", अशी पोस्ट शेअर करत तिने आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सारा अली खान तिच्या वैयक्तिक आयुष्याबरोबरच चित्रपटांमुळे सुद्धा चर्चेत येत असते. अलिकडेच तिचा 'स्काय फोर्स' हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. 'स्काय फोर्स'मध्ये सारा अली खानसह अक्षय कुमार वीर पहारिया, आणि निम्रत कौर यांसारखे तगडे कलाकार मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले.