प्रेक्षकांना धक्का! राणी मुखर्जीची 'ओह माय गॉडेस' मधून एक्झिट, 'या' कारणामुळे सोडला अक्षयचा सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 16:39 IST2026-03-07T16:35:39+5:302026-03-07T16:39:52+5:30

अक्षय कुमारचा 'OMG 3' राणी मुखर्जीने का सोडला? समोर आलं मोठं कारण

bollywood actress rani mukerjee take exit from akshy kumar oh my goddess movie know the reason  | प्रेक्षकांना धक्का! राणी मुखर्जीची 'ओह माय गॉडेस' मधून एक्झिट, 'या' कारणामुळे सोडला अक्षयचा सिनेमा

प्रेक्षकांना धक्का! राणी मुखर्जीची 'ओह माय गॉडेस' मधून एक्झिट, 'या' कारणामुळे सोडला अक्षयचा सिनेमा

Rani Mukerjee : बॉलिवूडची मर्दानी म्हणजेच अभिनेत्री राणी मुखर्जी ही तिच्या अभिनयासह चित्रपटांसाठी देखील ओळखली जाते. राणी मुखर्जीने आपल्या आजवरच्या कारकि‍र्दीत एकापेक्षा आणि सरस चित्रपटांमध्ये केलं आहे. मर्दानी ३ च्या यशानंतर राणी लवकरच अक्षय कुमारच्या 'ओह माय गॉड' फ्रॅचायझीच्या तिसऱ्या भागात झळकणार असल्याची माहिती समोर आली होती.अशातच या प्रोजेक्टबाबत एक मोठी अपडेट हाती आली आहे.

राणी मुखर्जी आणि अक्षय कुमार बऱ्याच प्रतीक्षेनंतर 'ओह माय गॉडेस' च्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार होते. त्यामुळे अनेक प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती.परंतु, आता राणी या प्रोजेक्टचा भाग नसल्याची माहिती समजते आहे. 

बॉलीवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, अमित राय दिग्दर्शित 'ओएमजी ३' मध्ये राणी मुखर्जी काम करणार होती. राणी मुखर्जीने चित्रपट साइन केला नसला तरी तिला स्क्रिप्ट ऐकवण्यात आली होती.चित्रपटाच्या कथेने अभिनेत्री खूप प्रभावित झाली होती आणि पुढील चर्चाही होणार होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, राणी मुखर्जी आणि दिग्दर्शकांच्या सर्जनशील मतभेदांमुळे अभिनेत्रीने या प्रोजेक्टमध्ये माघार घेतली आहे.राणी मुखर्जीला पटकथा आवडली, परंतु काही कारणास्तव तिने या चित्रपटातून एक्झिट घेतल्याचं कळतंय. त्यानंतर निर्माते आता दुसऱ्या अभिनेत्रीला कास्ट करण्याचा विचार करत आहेत.

Web Title : रानी मुखर्जी ने अक्षय कुमार की 'ओएमजी 3' छोड़ी।

Web Summary : निर्देशक के साथ रचनात्मक मतभेदों के कारण रानी मुखर्जी अब 'ओएमजी 3' का हिस्सा नहीं हैं। उन्हें स्क्रिप्ट पसंद आई लेकिन आखिरकार उन्होंने प्रोजेक्ट से नाम वापस ले लिया। निर्माता अब अक्षय कुमार अभिनीत फिल्म के लिए एक प्रतिस्थापन अभिनेत्री की तलाश कर रहे हैं।

Web Title : Rani Mukerji exits 'OMG 3' with Akshay Kumar.

Web Summary : Rani Mukerji is no longer part of 'OMG 3' due to creative differences with the director. She liked the script but ultimately withdrew from the project. Producers are now seeking a replacement actress for the film starring Akshay Kumar.