'रेस-४' मध्ये 'या' लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची वर्णी; सैफ अली खानसोबत करणार स्क्रीन शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 09:03 IST2025-03-01T09:02:33+5:302025-03-01T09:03:38+5:30
सैफ अली खानच्या (Saif Ali Khan) सुपरहिट असलेल्या 'रेस' फ्रॅंचाईजीचा चौथा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'रेस-४' मध्ये 'या' लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची वर्णी; सैफ अली खानसोबत करणार स्क्रीन शेअर
Race-4 Update: सैफ अली खानच्या (Saif Ali Khan) सुपरहिट असलेल्या रेस फ्रॅंचाईजीचा चौथा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलिकडेच निर्माते रमेश तौरानी यांनी त्यांच्या आगामी 'रेस ४' चित्रपटाची घोषणा केली आहे, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये सैफच्या या आगामी चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, रेस-४ मध्ये सैफ अली खानसह बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra)दिसणार आहे. परंतु, या चित्रपटात नायिकेची भूमिका कोण साकारणार याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. त्यात आता या चित्रपटासंदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. या चित्रपटात आता प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीची वर्णी लागली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री रकुल प्रीत सिंग चित्रपटात मुख्य नायिकेच्या भूमिकेत दिसण्याची आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. दरम्यान, 'रेस-४' साठी चित्रपटाची टीम एका नवीन चेहऱ्याच्या शोधात होती. त्यात आता रकुल प्रीत सिंगचं नाव आता समोर येत आहे. त्यामुळे प्रेक्षकांनाही सैफ अली खान, रुकुल आणि सिद्धार्थ मल्होत्रा या त्रिकुटाला मोठ्या पडद्यावर एकत्र बघायला आवडेल.
रकुल प्रीत सिंगच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर अभिनेत्री अलिकडेच 'मेरे हसबंड की बिवी' चित्रपटामुळे चर्चेत आली होती. या चित्रपटात तिने अर्जुन कपूरसोबत स्क्रीन शेअर केल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर रकुल आता पूर्णपमणे वेगळ्या जॉनरच्या चित्रपटात दिसणार आहे.