लॉस अँजिलिसच्या जंगलामध्ये आगीचं तांडव, प्रियंका चोप्राने व्हिडीओ शेअर करत दाखवली भयानक परिस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 13:12 IST2025-01-09T13:09:36+5:302025-01-09T13:12:33+5:30
अभिनेत्री प्रियंका चोप्राने सोशल मीडियावर अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाच्या जंगलातील आगीची भयानक दृश्ये दाखविली आहेत.

लॉस अँजिलिसच्या जंगलामध्ये आगीचं तांडव, प्रियंका चोप्राने व्हिडीओ शेअर करत दाखवली भयानक परिस्थिती
Priyanka Chopra : अमेरिकेतील (America) कॅलिफोर्नियाच्या जंगलामध्ये मंगळवारी आगीमुळे अनेक घरं जळून खाक झाली आहेत. ही आग एवढी भडकली आहे की आता लॉस अँजेलिसच्या नागरी वस्ती आणि ह़ॉलिवूडची लोक राहतात त्या हिल्सपर्यंत पोहोचली आहे. या आगीमध्ये काही जणांचा होरपळून मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले आहेत. तर जवळपास ३० हजार लोकांना आपलं राहतं घर सोडावं लागलं आहे. शिवाय काही हॉलिवूड कलाकारांचे बंगले देखील या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत. दरम्यान, या घटनेवर आता अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) सोशल मीडियाद्वारे व्यक्त झाल्याची पाहायला मिळतेय.
बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा लग्नानंतर अमेरिकत स्थायिक झाली. आता ती हॉलिवूडमध्ये सक्रिय असल्याची पाहायला मिळते. प्रियंका तिच्या पती निक जोनाससह अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये राहते. प्रियंका दरम्यान, प्रियंकाने तिच्या इन्स्टाग्रामवर लॉस अँजेलिस शहरातील काही फोटो व्हिडीओ शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अमेरिकेतील लॉस एंजिलिस शहरामधील आगीची दृश्ये पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियावर अभिनेत्रीने त्या आगीच्या घटनेचे फोटो शेअर करत लिहिलंय, "या भीषण आगीमुळे नुकसान झालेल्या सर्वांसोबत माझ्या संवेदना. मला आशा आहे की आपण सर्वजण सुरक्षित राहू."
पुढे प्रियंकाने एका व्हिडीओ शेअर त्यावर कॅप्शन देत तिने म्हटलंय, "लॉस अँजलिसमध्ये ज्या पद्धतीने आग वाढत चालली आहे. त्यामुळे हजारो लोकांचं नुकसान झालं आहे. त्यानंतर तिने आणखी एक पोस्ट शेअर करत अग्नीशमन दलातील जवानांचं कौतुक करत त्यांचे आभार मानले आहेत. या परिस्थितीतही बहादुरीचं काम करणाऱ्या जवानांना माझा सलाम. आगीमध्ये अडकलेल्या लोकांची सुखरुप सुटका करुन रात्रभर झटणाऱ्या या जवानांचे खूप खूप आभार!"असं तिने म्हटलंय.