"पुरुषांना अधिक संधी मिळतात, पण स्त्रियांना...", बॉलिवूड अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य, इंडस्ट्रीतील भेदभावावर म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 10:49 IST2025-07-25T10:47:36+5:302025-07-25T10:49:45+5:30
"व्हॅनिटी व्हॅन वापरण्यासाठीही परवानगी मागावी लागली...", बॉलिवूड अभिनेत्रीने व्यक्त केली नाराजी

"पुरुषांना अधिक संधी मिळतात, पण स्त्रियांना...", बॉलिवूड अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य, इंडस्ट्रीतील भेदभावावर म्हणाली...
Nushrratt Bharuccha: मराठी किंवा हिंदी सिनेसृष्टी असो अनेक कलाकार त्यांना या क्षेत्रात काम करताना आलेले अनुभव शेअर करत असतात. बऱ्याचदा कलाकारांना करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, खूप कमी कलाकार त्याबद्दल बोलतात. अशातच बॉलिवूडच्या एका लोकप्रिय अभिनेत्रीने इंडस्ट्रीतील भेदभावाबद्दल खुलासा केला आहे. ही अभिनेत्री म्हणजे नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha) . अभिनेत्रीने एका मुलाखतीदरम्यान, इंडस्ट्रीतील व्यथा मांडली आहे.
नयनदीप रक्षित यांना दिलेल्या मुलाखतीत नुसरत भरुचाने पुरुष कलाकारांच्या तुलनेत महिला कलाकारांना दुय्यम वागणूक दिली जाते, असं तिने म्हटलं आहे. त्यादरम्यान, मुलाखतीमध्ये म्हणाली, "एखाद्या अभिनेत्याचा चित्रपट हिट झाला तर त्याला कामाच्या संधी उपलब्ध होतात. मग तो इनसाइडर असो किंवा आऊटसाइडर. पण, याउलट महिला कलाकारांना कायम संघर्ष करावा लागतो. मी 'प्यार का पंचनामा' चित्रपटापासून हेच बोलते आहे. तुम्हाला फक्त संधी हवी असते. आपल्याकडे अभिनेत्यांना जितक्या संधी मिळतात त्या तुलनेत स्त्रियांना कमी संधी मिळते."
व्हॅनिटी व्हॅन वापरण्यासाठीही परवानगी मागावी लागली...
याबद्दल सांगताना नुसरत म्हणाली, "एक वेळ अशी देखील होती जेव्हा मी विचारायचे की, फक्त पाच मिनिटांसाठी हिरोच्या व्हॅनिटीचा वापर करू शकते का? तो इथे नाहीये, मी वॉशरूम वापरू शकते का? पण, त्यावेळी मी तक्रारही केली नाही. मी स्वतःला सांगायचे की मी इतकी मेहनत करेन की अशा गोष्टी मला सहज मिळतील."
बिझनेस क्लासने प्रवास करेन असं ठरवलं...
पुढे अभिनेत्री करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल म्हणाली, "मी नेहमी इकोनॉमी क्लासमधून प्रवास करायचे. पण, आता बिझनेस क्लासमधून प्रवास करते. जर तिकिटचं मिळालं नाही तर गोष्ट वेगळी आहे. मला आठवतंय एका चित्रपटामध्ये माझी भूमिका अगदीच छोटी होती. त्यावेळी सगळी स्टारकास्ट बिझनेस क्लासमध्ये बसली होती आणि मला इकोनॉमी क्लासमध्ये बसवण्यात आलं. त्यातील काहींनी मला त्यांच्यासोहबत बस असं म्हटलं होतं. पण, मी नाही म्हणाले आणि तेव्हाच मनाशी ठरवलं की मी प्रचंड मेहनत करेन आणि प्रोडक्शन हाऊस माझी बिझनेस क्लासमध्ये व्यवस्था करेल."