"चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला अन् मारलंही...", प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीसोबत अज्ञाताने केलेलं गैरवर्तन, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 11:24 IST2025-07-12T11:21:01+5:302025-07-12T11:24:07+5:30

" त्याने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आणि जोरात मारलं...", प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलेला 'तो' भयावह प्रसंग 

bollywood actress metro in dino fame fatima sana shaikh reveals in interview a unknown person misbehaved inappropriately touch her | "चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला अन् मारलंही...", प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीसोबत अज्ञाताने केलेलं गैरवर्तन, म्हणाली...

"चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला अन् मारलंही...", प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीसोबत अज्ञाताने केलेलं गैरवर्तन, म्हणाली...

Bollywood Actress Fatima Sana Shikh :बॉलिवूड इंडस्ट्रीत 'दंगल गर्ल' म्हणून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री फातिमा सना शेख (Fatima Sana Shikh) प्रचंड चर्चेत आहे. सध्या फातिमा आता 'मेट्रो इन दिनों' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 'मेट्रो...इन दिनो'मध्ये आदित्य रॉय कपूर-सारा अली खान, अनुपम खेर-नीना गुप्ता, अली फजल-फातिमा सना शेख आणि पंकज त्रिपाठी-कोंकणा सेन शर्मा अशा इंटरेस्टिंग जोड्या आहेत.   अशातच या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीमुळे फातिमा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेला भयावह प्रसंगाविषयी खुलेपणाने सांगितलं आहे. 

नुकतीच फातिमा सना शेखने 'Hauterrfly' ला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, 'एकदा एका माणसाने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, म्हणून मी त्याला मारलं. पण त्यानंतर त्या माणसानेच मला इतकं जोरात मारलं आणि मी जमिनीवर पडले. त्यानंतर पुढे फातिमाने सांगितलं की, "त्याने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला म्हणूनच मी त्याला मारलं. त्याचा त्या माणसाला इतका राग आला की त्याने इतकं जोरात मारलं की मी जमीनीवर पडले. त्या घटनेनंतर मी सावध झाले. मला समजलं की अशा परिस्थिती आपण कशा पद्धतीने रिअॅक्ट झालं पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे जर आपल्यासोबत काहीतरी चुकीचं घडत असेल तर त्यावर आपण कशी प्रतिक्रिया द्यायची याबद्दलही विचार करणं गरजेचं आहे. "

लॉकडाऊनमध्ये आला विचित्र अनुभव...

या मुलाखतीमध्ये फातिमा आणखी एक किस्सा शेअर केला जो लॉकडाऊनच्या काळात घडला होता. त्याबद्दल सांगताना तिने म्हटलं,'लॉकडाऊन दरम्यान मी मुंबईत तोंडाला मास्क लावून सायकल चालवत होतो. तेव्हा एक टेम्पो ड्रायव्हर सतत हॉर्न वाजवत होता आणि विचित्र आवाज करत होता. मी माझ्या घराच्या जवळ येईपर्यंत तो माझा पाठलाग करत राहिला. असा धक्कादायक खुलासा तिने केला. 

Web Title: bollywood actress metro in dino fame fatima sana shaikh reveals in interview a unknown person misbehaved inappropriately touch her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.