प्रसिद्धीच्या शिखरावर असताना इंडस्ट्री सोडून संन्यास घेतला! २५ वर्षानंतर प्रसिद्ध अभिनेत्री टीव्हीवर परतली, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 12:27 IST2026-03-01T12:26:13+5:302026-03-01T12:27:00+5:30

प्रसिद्धीच्या शिखरावर असताना ५२ व्या वर्षी संन्यास घेतला, २५ वर्षानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीचं इंडस्ट्रीत पुरागमन, कारण सांगत म्हणाली...

bollywood actress mamta kulkarni makes her first tv appearance after 25 years in laughter chef season 3 | प्रसिद्धीच्या शिखरावर असताना इंडस्ट्री सोडून संन्यास घेतला! २५ वर्षानंतर प्रसिद्ध अभिनेत्री टीव्हीवर परतली, म्हणाली...

प्रसिद्धीच्या शिखरावर असताना इंडस्ट्री सोडून संन्यास घेतला! २५ वर्षानंतर प्रसिद्ध अभिनेत्री टीव्हीवर परतली, म्हणाली...

Mamta Kulakarni: ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे ममता कुलकर्णी. जवळपास आपल्या १४ वर्षांच्या कारकीर्दीत तिने ४० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'आशिक आवारा,करण-अर्जुन,वक्त हमारा है यांसारख्या चित्रपटांमुळे ममता आजही चाहत्यांमध्ये ओळखली जाते. चित्रपटांतील आपल्या धाडसी आणि बोल्ड बिनधास्त भूमिकांमुळे रातोरात प्रसिद्धी झोतात आलेली ममता कुलकर्णी अचानक इंडस्ट्रीतून गायब झाली आणि ती संन्यासी झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. 
महाकुंभवेळी ती किन्नर आखड्याचं महामंडलेश्वर पद स्विकारताना दिसली. यावरून वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यानंतर ममता कुलकर्णीने या पदाचा राजीनामा दिला. आता पुन्हा एकदा अभिनेत्री चर्चेत आली आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

दरम्यान, ग्लॅमरस विश्वापासून दुरावलेली ममता कुलकर्णी आता जवळपास २५ वर्षानंतर पुन्हा या विश्वात परतली आहे.टीव्हीवरील लोकप्रिय असलेल्या "लाफ्टर शेफ्स अनलिमिटेड एंटरटेनमेंट सीझन 3" या कुकिंग रिअॅलिटी शोच्या माध्यमातून तिने टीव्हीवर कमबॅक केल्याची माहिती समोर येते आहे. अलिकडेच ममता कुलकर्णी कॉमेडियन भारती सिंगच्या "लाफ्टर शेफ्स" या रिअॅलिटी शोच्या सेटवर दिसली. यावेळी ममताने माध्यमांशी संवाद साधला आणि तिच्या कमबॅकबद्दल प्रतिक्रिया दिली. शिवाय बऱ्याच काळानंतर टीव्हीवर येत असल्याने आपण उत्साहित असल्याचंही तिने यावेळी सांगितलं.

यावेळी ममता कुलकर्णी म्हणाली, "मी खूप उत्साहित आहे.कारण,मी जवळपास २५ वर्षांनंतर टेलिव्हिजनवर परत येत आहे. तुमच्या लक्षात असेल, तर मी माझ्या आयुष्याच्या गेल्या २५ वर्षात टेलिव्हिजनवर आलेली नाही. ही खूप चांगली संधी आहे, हसण्याची संधी... लोक खूप गंभीर झाले आहेत, जीवन खूप गंभीर झाले आहे... सर्वत्र गंभीरता आहे, मग स्वयंपाक करताना हसण्यापेक्षा चांगले काय असू शकते?" अशा भावना तिने व्यक्त केल्या. त्यानंतर अभिनेत्रीला या शोबद्दल विचारलं गेलं असता ती म्हणाली, "मी या शोचे दोन-तीन भाग पाहिले आहेत आणि मला हा शो खूप आवडला आहे."

कुकिंग आणि विनोदी संकल्पनेवर आधारित असलेला हा शो प्रेक्षकांची मने जिंकत आहे. लाफ्टर शेफच्या तिसऱ्या सीझनमध्ये अली गोनी, करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे टीव्ही सेलिब्रिटी पाहायला मिळत आहे.

Web Title : ममता कुलकर्णी 25 साल बाद टीवी पर लौटीं

Web Summary : बोल्ड भूमिकाओं के लिए जानी जाने वाली अभिनेत्री ममता कुलकर्णी 25 साल बाद "लाफ्टर शेफ्स" पर टेलीविजन पर लौटीं। उन्होंने वापसी और शो की हास्यपूर्ण खाना पकाने की अवधारणा के बारे में उत्साह व्यक्त किया।

Web Title : Mamta Kulkarni Returns to TV After 25-Year Sabbatical

Web Summary : Actress Mamta Kulkarni, known for bold roles, returns to television after 25 years on "Laughter Chefs." She expressed excitement about the comeback and the show's comedic cooking concept, emphasizing the need for laughter.