"मला करिअर, कपडे अन् रिलेशनशिपवरून...", मलायका अरोरानं मांडली मनातली व्यथा, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 12:17 IST2025-09-17T12:12:51+5:302025-09-17T12:17:17+5:30
"मला कपड्यांवरून बोलले, रिलेशनशिपवर देखील..."; मलायका अरोरानं व्यक्त केली खंत

"मला करिअर, कपडे अन् रिलेशनशिपवरून...", मलायका अरोरानं मांडली मनातली व्यथा, म्हणाली...
Malaika Arora:बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, नृत्यांगणा म्हणून प्रसिद्ध असलेल्या मलायका अरोराला कोणत्याही परिचयाची गरज नाही. मलायका तिचं नृत्यकौशल्य, सौंदर्य आणि फिटनेसनेही सर्वाचं लक्ष वेधून घेते. मात्र, या नायिकेने वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले. अरबाज खानसोबत घटस्फोट त्यानंतर अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपच्या चर्चा यामुळे मलायका चर्चेत राहिली. यामुळे तिच्यावर टीकाही झाली. त्यावर आता या अभिनेत्रीने भाष्य करत टोलर्सना सणसणीत उत्तर दिलं आहे.
अशातच नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मलायका अरोराने टीकाकारांना स्पष्ट शब्दांत उत्तर देत तिचं मत व्यक्त केलं आहे. 'हिंदुस्तान टाइम्स' सोबत साधलेल्या संवादात मलायका म्हणाली,"तुम्ही कसं असावं किंवा असू नये याबद्दल लोक कायम बोलत असतात. सुरुवातीला माझ्यासाठी ते खूप कठीण होतं. मला तर माझं करिअर, कपड्यांपासून ते वैयक्तिक आयुष्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी ट्रोल केलं गेलं. त्यामुळे मी याचा विचार करणंच बंद केलं तेव्हा कुठे मला मुक्त झाल्यासारखं मला वाटलं. शेवटी तुम्ही स्वत: बद्दल काय विचार करता हे महत्त्वाचं असतं."
अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर झालेल्या टीकेबद्दल बोलताना ती म्हणाली,"मला असंही बोलण्यात आलं की तू खूप बोल्ड आहेस, फटकळ आहेस.पण, हेच माझ्या वागण्यातील खरेपण आहे."
सेल्फ डाऊटबद्दल मलायका काय म्हणाली?
"स्वतःबद्दल शंका निर्माण होणं,हा एक मानवी स्वभाव आहे. असे विचार मनात येतच असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात असे दिवस येतात, माझा स्वत:शीच एक वाद सुरु असतो. गेल्या काही वर्षांत मी त्या गोष्टी टीका म्हणून घेण्यापेक्षा सकारात्मक दृष्टिकोनातून घेण्यास सुरुवात केली आहे." अशा भावना अभिनेत्रीने व्यक्त केल्या.