२० वर्षांचा संसार मोडला, घटस्फोटानंतर ११ वर्ष लहान अभिनेत्याला डेट; आता जगतेय एकाकी आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 16:05 IST2024-10-23T16:00:41+5:302024-10-23T16:05:47+5:30
'मुन्नी बदनाम हुई' तसेच 'चल छैया छैया' यांसारख्या सुपरहिट गाण्यांमुळे अभिनेत्री मलायका (Malaika Arora) अरोरा नावारुपाला आली.

२० वर्षांचा संसार मोडला, घटस्फोटानंतर ११ वर्ष लहान अभिनेत्याला डेट; आता जगतेय एकाकी आयुष्य
Malaika Arora : 'मुन्नी बदनाम हुई' तसेच 'चल छैया छैया' यांसारख्या सुपरहिट गाण्यांमुळे अभिनेत्री मलायका (Malaika Arora) अरोरा नावारुपाला आली. बॉलिवूडची फॅशन दिवा म्हणून तिला ओळखलं जातं. हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी ती एक आहे. मलायका तिच्या अभिनयापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली.
२०१७ मध्ये घेतला घटस्फोट
अरबाज खान आणि मलायका अरोरा यांनी १९९८ मध्ये लग्नबंधनात अडकले होते. त्यांनी एक मुलगा देखील आहे. परंतु काही मतभेदांमुळे त्यांनी नात्याला पूर्णविरााम दिला. लग्नाच्या २० वर्षानंतर मलायकाने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. २०१७ मध्ये ती पती अरबाज खानपासून विभक्त झाली.
११ वर्ष लहान अभिनेत्याला केलं डेट
मलायकाने अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर ११ वर्षांनी लहान बॉलिवूड अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. २०१८ पासून मलायका आणि अर्जून कपूर एकमेकांना डेट करत होते. अनेक ठिकाणी ते स्पॉटही झाले होते. परंतु त्यांनी या रिलेशनशिपबद्दल अधिकृतपणे कबुली दिली नव्हती. अलिकडेच या दोघांमध्ये ब्रेकअप झाल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरत होती.
मलायका अरोराने अलिकडेच मराठी चित्रपट 'येक नंबर' मध्ये ऑयटम सॉंग्समुळे प्रकाशझोतात आली. 'अनारकली डिस्को चली', 'छैया छैया', 'ढोलना', 'आप जैसा कोई', 'काल धमाल', माही वे यांसारख्या गाण्यांनी तिला खरी ओळख मिळवून दिली. आज २३ ऑक्टोबरच्या दिवशी मलायका वाढदिवस साजरा करते आहे. अभिनेत्रीने अनेक डान्स रिअॅलिटी शोमध्ये परिक्षकाची भूमिका निभावली आहे.