प्रसिद्धीसाठी काहीपण! ८ महिन्यांनी अभिनेत्रीचं सोशल मीडियावर कमबॅक, पण नावच बदललं; का घेतला 'हा' निर्णय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 10:35 IST2025-08-07T10:30:17+5:302025-08-07T10:35:47+5:30
पदार्पण करताच पहिला चित्रपट फ्लॉप अन् झाली गायब! आता अभिनेत्रीनं नावच बदललं, काय असेल कारण?

प्रसिद्धीसाठी काहीपण! ८ महिन्यांनी अभिनेत्रीचं सोशल मीडियावर कमबॅक, पण नावच बदललं; का घेतला 'हा' निर्णय?
Warina Hussain : मनोरंजनविश्वात असे अनेक कलाकार सापडतील ज्यांची पडद्यावर दिसणारी नावं ही खरी नसून त्यांनी आपल्या नावात बदल केला आहे. पडद्यावर एक नाव आणि कागदोपत्री एक नाव अशी संकल्पना फार जुनी आहे. सध्या इंडस्ट्रीत अशाच एका अभिनेत्रीबद्दल चर्चा सुरु आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे वारिना हुसेन आहे. लवयात्री चित्रपटातून वारिना इंडस्ट्रीत पदार्पण केलं. या चित्रपटात सलमानचा मेहुणा अभिनेता आयुष शर्मासोबत ती झळकली. परंतु, त्यांतर अभिनेत्री इंडस्ट्रीपासून दुरावली. शिवाय सोशल मीडियावरही फारशी सक्रिय नव्हती.
दरम्यान, जवळपास ८ महिन्यानंतर अभिनेत्री वारिना हुसैनने एक पोस्ट शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय. सोशल मीडियावर परतल्यानंतर अभिनेत्रीने चक्क तिच्या नावात बदल केला आहे. वारिनाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत त्यामध्ये लिहिलंय की, मी अधिकृतपणे माझं नाव बदलून हिरा वारीना असं ठेवलं आहे. अंकशास्त्रानुसार मी हा निर्णय घेतला आहे. त्यानंतर पुढे तिने म्हटलंय, नवा अध्याय आहे, परंतु भावना त्याच आहेत. जे लोक माझ्यासोबत आहेत त्यांचं प्रेम माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. अशी पोस्ट लिहून तिने भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेत्रीच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी लाईक्स आणि कमेंट्स करत शुभेच्छांचा वर्षाव केला.
वारीना हुसैनबद्दल सांगायचं झालं तर तिने मॉडेलिंग क्षेत्रापासून आपल्या करिअरची सुरुवात केली. याशिवाय काही जाहिरातींमध्येही तिने काम केलं आहे. २०१८ मध्ये आलेल्या लव्हयात्री चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. परंतु हा चित्रपट फारसा चालला नाही. त्यानंतर वारिना 'दबंग-३', 'गॉड फादर', 'यारियॉं-२' यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकली.