लेकाच्या हातात आईची सॅण्डल, करीना कपूरच्या लेकानं जिंकली मनं; तैमुरचे फोटो पाहून नेटकरी म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 11:39 IST2025-01-05T11:33:53+5:302025-01-05T11:39:38+5:30
मम्माज बॉय! करीना कपूरच्या लेकानं जिंकली सर्वांची मनं; फोटो पाहून नेटकरी म्हणाले...

लेकाच्या हातात आईची सॅण्डल, करीना कपूरच्या लेकानं जिंकली मनं; तैमुरचे फोटो पाहून नेटकरी म्हणाले...
Kareena Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) सोशल मीडियावर कायमच चर्चेत येत असते. करीनाप्रमाणे तिच्या मुलांचीही सोशल मीडियावर चर्चा रंगलेली असते. करीनाला दोन गोंडस मुलं आहेत तैमूर आणि जेह. त्यांच्या क्युट लुक्समुळे या दोघांचे फोटो सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात. परंतु करीनाचा धाकटा मुलगा तैमुर हा अगदी लहान असल्यापासूनच प्रसिद्धीझोतात आला. तैमुर बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय स्टारकिड्सपैकी आहे. गोरा रंग, घारे डोळे आणि त्याच्यात कपूर्सची झलक दिसते. दरम्यान, नुकताच करीनाने सोशल मीडियावर तिचा लाडका लेक तैमुरचा एक फोटो शेअर केला आहे, त्यामुळे सगळीकडेच त्यांचीच चर्चा होताना दिसतेय.
करीना कपूर आपल्या कुटुंबीयांसोबत नवीन वर्षाच्या सेलेब्रेशनसाठी परदेशात गेली आहे. वेकेशनचे वेगवेगळे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते आहे. त्याचबरोबर अभिनेत्रीने तिचा लेक तैमुरचा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. या फोटोमध्ये तैमुर पाठमोरा असून त्याच्या हातात आईची सॅण्डल पाहायला मिळते आहे. करीनाने इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर करत कॅप्शनध्ये लिहिलंय की, "आईची सेवा, या वर्षी आणि कायमच. नवीन वर्षांच्या तुम्हाला खूप शुभेच्छा. अजूनही बरेच फोटो आहेत ते मी अपलोड करेन. "
करीनाने शेअर केलेल्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांसह बऱ्याच कलाकार मंडळींनी तैमुरचं कौतुक करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्रीने शेअर केलेला तैमुरचा फोटो पाहून एका नेटकऱ्याने 'जेंटलमॅन...' अशी कमेंट केली आहे. तर आणखी एका यूजरने म्हटलंय, "खूप सुंदर...".