नर्गिस नव्हे करीना कपूर असती 'रॉकस्टार'ची मुख्य अभिनेत्री! रणबीरमुळे हातून गेला चित्रपट, नेमकं काय झालं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 17:36 IST2025-08-26T17:33:48+5:302025-08-26T17:36:21+5:30
'रॉकस्टार'साठी नर्गिस नव्हे करीना होती पहिली पसंती, पण...

नर्गिस नव्हे करीना कपूर असती 'रॉकस्टार'ची मुख्य अभिनेत्री! रणबीरमुळे हातून गेला चित्रपट, नेमकं काय झालं?
Rockstar Movie: प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या यादीत 'रॉकस्टार' चित्रपटाचं नाव अव्व्ल स्थानावर आहे. २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि नर्सिग फाखरी मुख्य भूमिकेत होते. 'रॉकस्टार' चित्रपटातील गाणी, कलाकारांचा अभिनय आजही प्रेक्षक विसरले नाही. या चित्रपटाचा एक वेगळाचा चाहतावर्ग निर्माण झाला. मात्र, तुम्हाला माहितीये का सुपरहिट चित्रपटासाठी नर्गिस नव्हे तर अभिनेत्री करीना कपूरला कास्ट करण्याचा दिग्दर्शकाचा विचार होता.परंतु, तसं घडलं नाही.
मीडिया रिपोर्टनुसार, 'जब वी मेट' मधील करीनाचा अभिनय पाहून इम्तियाज अली तिच्यावर खूप इम्प्रेस झाले होते. त्यामुळे त्यांनी 'रॉकस्टार' मध्ये करीनाला कास्ट करण्याचं ठरलं होतं. मात्र, काही कारणामुळे ते शक्य झालं नाही. त्यामुळे करीनाच्या जागी नर्गिसला फायनल करण्यात आलं. हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, रणबीर कपूर याविषयी खुलासा करत म्हणाला होता की,करीनाला तिच्या मेहनतीमुळे आणि टॅलेंटमुळे मोठ-मोठ्या दिग्दर्शकांसोबत काम करण्याची संधी मिळाली. पण, त्यांच्या भावा-बहिणीच्या नात्यामुळे तो तिच्यासोबत चित्रपटात काम करू शकला नाही.
याविषयी बोलताना रणबीर म्हणाला, मला याच गोष्टीचं वाईट वाटलं की तिच्यासोबत मला काम करता आलं नाही. परंतु, भविष्यात आम्ही नक्कीच एकत्र काम करु.दरम्यान, रणबीरची करीनासोबत काम करण्याची संधी हुकली. मात्र,त्याला शम्मी कपूर यांच्यासोबत स्क्रिन शेअर करता आली. शम्मी कपूर यांनी चित्रपटात उस्ताद जमील खान नावाची व्यक्तिरेखा साकारली होती.