"अंधारानंतर प्रकाश हा येतोच म्हणून...", अभिनेत्री करीना कपूरच्या 'त्या' पोस्टने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 09:08 IST2025-02-20T09:06:17+5:302025-02-20T09:08:51+5:30

बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) मागील काही  दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे.

bollywood actress kareena kapoor cryptic post caught attention netizens react | "अंधारानंतर प्रकाश हा येतोच म्हणून...", अभिनेत्री करीना कपूरच्या 'त्या' पोस्टने वेधलं लक्ष

"अंधारानंतर प्रकाश हा येतोच म्हणून...", अभिनेत्री करीना कपूरच्या 'त्या' पोस्टने वेधलं लक्ष

Kareena Kapoor: बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) मागील काही  दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. अगदी काही दिवसांपूर्वीच तिचा पती सैफ अली खानवर राहत्या घरात घुसून एका चोराने चाकू हल्ला केला होता. यामध्ये सैफ अली खान जखमी झाला. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. या घटनेतून आता त्याचं कुटुंब सावरत आहे. या सगळ्या गोष्टी घडत असताना करीना या प्रसंगात सैफ अली खानच्या पाठीशी खंबीरपणे उभी असलेली पाहायला मिळाली. तिने बऱ्याच कठीण प्रसंगांचा सामना केला. या घटनेतून आता सगळे सावरत आहेत. दरम्यान, अशातच अभिनेत्री सोशल मीडियावर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे नेटकऱ्यांकडून अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.


सध्या करीनाच्या कुटुंबामध्ये लग्नाचा माहौल असल्याचा पाहायला मिळतोय. अभिनेत्रीच्या आत्याचा मुलगा अदर जैन आता हिंदू रितीरिवाजानुसार लग्न करणार आहे. त्यामुळे त्यांच्या घरी लगीनघाई सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. त्यानिमित्ताने, अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. याशिवाय पोस्टमध्ये तिने लिहिलेलं कॅप्शन लक्षवेधी ठरत आहे. "अंधारानंतर प्रकाश हा नक्कीच येतो. त्यामुळे नकारात्मकता सोडा आणि आनंदाचा स्वीकार करा. माझ्या जवळच्या लोकांसोबत प्रेम, आनंदाचे क्षण साजरे करत आहे. प्रेम कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त असतं." अशा आशयाची पोस्ट तिने शेअर केली आहे. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये भलतीच चर्चा रंगली आहे. ही पोस्ट अभिनेत्रीने कोणत्या उद्देशाने लिहिली आहे असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

सध्या कपूर कुटुंबामध्ये आनंदाच वातावरण आहे. रणबीर कपूर, करीना कपूर व करिश्मा कपूर यांच्या आत्याचा मुलगा अभिनेता आदर जैन गर्लफ्रेंड अलेखा अडवाणीबरोबर १२ जानेवारी २०२५ रोजी लग्नबंधनात अडकला. गोव्यात आदर व अलेखा यांनी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं होतं. आता पुन्हा ते हिंदू रितीरिवाजानूसार लग्न करणार आहेत. काल आदर जैनचा मेहंदी सोहळा पार पडला या सोहळ्याला करीना कपूर आणि करिश्मा कपूरयांच्यासह अनेकांनी हजेरी लावली होती.

Web Title: bollywood actress kareena kapoor cryptic post caught attention netizens react

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.