जया प्रदा यांना कसा वाटला रणवीरचा 'धुरंधर २'? प्रतिक्रिया देत म्हणाल्या-"हा चित्रपट…"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 17:03 IST2026-03-23T16:56:01+5:302026-03-23T17:03:07+5:30

"टीका करणं सोपं आहे, पण...",'धुरंधर २' बद्दल जया प्रदा यांचं वक्तव्य,‘प्रपोगंडा’ म्हणणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर

bollywood actress jaya prada praise aditya dhar for dhurandhar 2 movie says | जया प्रदा यांना कसा वाटला रणवीरचा 'धुरंधर २'? प्रतिक्रिया देत म्हणाल्या-"हा चित्रपट…"

जया प्रदा यांना कसा वाटला रणवीरचा 'धुरंधर २'? प्रतिक्रिया देत म्हणाल्या-"हा चित्रपट…"

Jaya Prada Reaction On Dhurandhar 2 :  दिग्दर्शक आदित्य धर यांच्या धुरंधर या स्पाय अॅक्शन चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.पहिल्या भागाच्या यशानंतर  आता 'धुरंधर- द रिवेंज' हा सीक्वल देखील सिनेरसिकांच्या पसंतीस उतरला आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट छप्परफाड कमाई करताना दिसतोय. एकीकडे रणवीर सिंग आणि सारा अर्जुनच्या या चित्रपटाचं सगळीकडे कौतुक होत असताना बॉलिवूड अभिनेत्री जया प्रदा यांनी देखील सिनेमाचं भरभरून कौतुक केलं आहे. तसेच धुरंधर २ ला प्रपोगंडा म्हणणाऱ्यांना अभिनेत्रीने सडेतोड उत्तरही दिलं आहे. 

अलिकडेच जया प्रदा यांनी एएनआय सोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचं आवाहन देखील केलं. शिवाय जया प्रदा यांनी 'धुरंधर: द रिव्हेंज' चित्रपटाची कथा, कलाकारांचा अभिनय याची प्रशंसा सुद्धा केली. त्या म्हणाल्या, “हा एक अप्रतिम चित्रपट आहे, जो लोकांनी अनेक वर्षांत पाहिला नाही. मला या चित्रपटाबद्दल खूप अभिमान वाटत आहे. लोकांना टीका करणे सोपे आहे. परंतु, चित्रपटामधील कलाकारांनी केलेले काम, दिग्दर्शकाने लिहिलेली पटकथा आणि हा चित्रपट यशस्वी करण्यासाठी सर्व कलाकारांनी घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे. मी सर्वांना हा चित्रपट पाहण्याचं आवाहन करते.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

धुरंधर २ मध्ये रणवीर सिंग दुहेरी भूमिकेत पाहायला मिळतोय. जसकिरत आणि हमजा अशी त्याने साकारलेल्या पात्रांची नावं आहे.  या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षक दोघांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 'धुरंधर २' ने अवघ्या चार दिवसांत जगभरात ६९१ कोटींहून अधिक कमाई केली आहे.

Web Title : जया प्रदा ने रणवीर की 'धुरंधर 2' की प्रशंसा की, दुष्प्रचार के दावों को नकारा।

Web Summary : जया प्रदा ने 'धुरंधर 2' की कहानी, अभिनय और निर्देशन की सराहना की। उन्होंने दर्शकों से देखने का आग्रह किया, 'दुष्प्रचार' के दावों को खारिज किया और टीम के प्रयासों पर प्रकाश डाला। रणवीर सिंह अभिनीत फिल्म ने दुनिया भर में ₹691 करोड़ से अधिक की कमाई की।

Web Title : Jaya Prada praises Ranveer's 'Dhurandhar 2', slams propaganda claims.

Web Summary : Jaya Prada lauded 'Dhurandhar 2,' praising the story, acting, and direction. She urged audiences to watch, dismissing 'propaganda' claims and highlighting the team's hard work. The film, starring Ranveer Singh in a dual role, has grossed over ₹691 crore worldwide.