हेमा मालिनींना मिळाला नाही पत्नीचा दर्जा; धर्मेंद्रसोबत लग्न केल्याचा अभिनेत्रीला झाला पश्चाताप?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 12:11 IST2023-04-06T12:10:43+5:302023-04-06T12:11:21+5:30

'मला हवं ते सगळं मिळालं नाही'; धर्मेंद्रसोबत दुसरं लग्न केल्यानंतर हेमा मालिनी यांनी व्यक्त केली खंत

bollywood actress breaks silence on life after getting married with dharmendra | हेमा मालिनींना मिळाला नाही पत्नीचा दर्जा; धर्मेंद्रसोबत लग्न केल्याचा अभिनेत्रीला झाला पश्चाताप?

हेमा मालिनींना मिळाला नाही पत्नीचा दर्जा; धर्मेंद्रसोबत लग्न केल्याचा अभिनेत्रीला झाला पश्चाताप?

बॉलिवूड कलाकार कायम त्यांच्या प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत येत असतात. यात सध्या अभिनेता धर्मेंद्र (dharmendra) आणि हेमा मालिनी (hema malini) यांच्या वैवाहिक जीवनाची चर्चा रंगली आहे. धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न झालेलं असतानाही हेमा मालिनी यांनी त्यांच्याशी दुसरा संसार थाटला. या संसारात त्यांना धर्मेंद्र यांच्याकडून प्रेम मिळालं. मात्र, एका पत्नीचे जे अधिकार असतात ते सारे अधिकार मात्र मिळाले नाही. ज्याची खंत हेमा मालिनी यांनी एका मुलाखतीत व्यक्त केली.

२०१८ मध्ये हेमा मालिनी यांनी एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत असलेल्या नात्यावर भाष्य केलं. तसंच दुसरी पत्नी म्हणून कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला हेदेखील त्यांनी सांगितलं.

"आमच्यात सारं काही सुरळीत होतं असं मी कधीच म्हणणार नाही. कारण, आपल्याला आयुष्यात जे सगळं हवं असतं ते मिळतच असं नाही. ज्यावेळी आपण तरुण असतो त्यावेळी सगळं परफेक्ट असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं.पण, त्या वाटण्याला काही अर्थ नसतो. मला जे हवं होतं ते सारंच मिळालं असं नाही. पण, ज्या गोष्टी माझ्याकडे नव्हत्या त्यांच्या विचारात रमणं मी बंद केलं होतं. माझ्याजवळ माझ्या दोन मुली होत्या. त्यामुळे माझ्या आयुष्यातली ३० वर्ष मी मुलींसोबत घालवली. त्यांना शाळेत सोडणं, त्यांचा अभ्यास घेणं, त्यांचे लाड-हट्ट पुरवणं सारं केलं. त्यांच्यामुळे मी बालपण पुन्हा जगले," असं हेमा मालिनी म्हणाल्या.

पुढे त्या म्हणतात, "आता माझ्या दोन्ही मुली मोठ्या झाल्या आहेत. आता आयुष्याच्या या टप्प्यावर उभं राहिल्यानंतर मागे वळून पाहताना काही तरी राहिलंय याची सतत जाणीव होते. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मला धर्मेंद्र यांची साथ हवी होती. लग्न झाल्यानंतर सारं नीट होईल असं वाटत होतं. पण, तसं काही झालं नाही. त्यामुळे जी परिस्थिती होती त्याचा मी स्वीकार केला.एक व्यक्ती म्हणून त्यांना याचा पश्चातापही होतो. पण, ज्यावेळी मी विचार करते, त्यावेळी ते माझ्यावर किती प्रेम करतात, त्यांच्या भावना त्यावेळी काय असतील याचा अंदाज येतो. त्यामुळे माझ्या आयुष्यात त्यांची उणीव..."

दरम्यान, हेमा मालिनी यांनी अर्ध्यावर वाक्य तोड त्यांच्या भावना व्यक्त केल्या. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी १९८० मध्ये लग्नगाठ बांधली. मात्र, धर्मेंद्र यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीला प्रकाश कौर यांना घटस्फोट न देता हेमा मालिनीसोबत दुसरं लग्न केलं होतं. या लग्नानंतर धर्मेंद्र यांनी दुसरं घर खरेदी केलं. विशेष म्हणजे लग्नाला ४० वर्ष उलटून गेल्यानंतरही हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या जुन्या घरची पायरी चढलेली नाही.
 

Web Title: bollywood actress breaks silence on life after getting married with dharmendra