प्यार का कोई फिक्स्ड रूट नहीं होता...! अनन्या पांडेचा नवा चित्रपट,'या' अभिनेत्यासोबत करणार रोमान्स 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 18:54 IST2026-04-06T18:52:34+5:302026-04-06T18:54:50+5:30

अनन्या पांडेची 'या' अभिनेत्यासोबत जमली जोडी! चांद मेरा दिल ची रिलीज डेट जाहिर, रोमँटिक केमिस्ट्री चर्चेत | 

bollywood actress ananya pandey and laksh lalwani starrer chand mera dil movie release date announced  | प्यार का कोई फिक्स्ड रूट नहीं होता...! अनन्या पांडेचा नवा चित्रपट,'या' अभिनेत्यासोबत करणार रोमान्स 

प्यार का कोई फिक्स्ड रूट नहीं होता...! अनन्या पांडेचा नवा चित्रपट,'या' अभिनेत्यासोबत करणार रोमान्स 

chand mera dil movie: गेल्या काही वर्षांमध्ये रोमॅंटिक चित्रपटाची क्रेझ कमालीची वाढली आहे. हे रोमॅंटिक चित्रपट कधी तुम्हाला हसवतात. तर कधी रडवतात. परंत, ते तुमच्या हृदयात हक्काचं स्थान मिळवतात.अशातच लवकरच असाच एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'चांद मेरा दिल' असं या चित्रपटाचं नाव आहे.  विवेक सोनी दिग्दर्शित आणि करण जोहरची निर्मिती असलेल्या या सिनेमात अभिनेत्री अनन्या पांडे आणि लक्ष लालवानी ही फ्रेश जोडी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. 


अलिकडेच करण जोहरने त्याच्या इंस्टाग्रामवर  'चांद मेरा दिल चित्रपटाचे अनेक नवीन पोस्टर्स शेअर केले आहेत. ज्यामध्ये अनन्या आणि लक्ष्य एका रोमँटिक अंदाजात पाहायला मिळत आहेत.  त्यांची ही केमिस्ट्री सध्या चर्चेत आहे. या पोस्टला कॅप्शन देत करण जोहरने लिहिलंय, "एक अशी प्रेमकथा जिथे आयुष्य प्रेमापेक्षा वेगाने धावते. 'चांद मेरा दिल' २२ मे २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल...", या नव्या पोस्टरने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

दरम्यान, २०२४ मध्ये या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती.अखेरीस 'चांद मेरा दिल'च्या प्रदर्शनाच्या तारेखवरून देखील पडदा हटविण्यात आला आहे. येत्या २२ मे रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. 

Web Title : अनन्या पांडे 'चांद मेरा दिल' में लक्ष लालवानी के साथ रोमांस करेंगी।

Web Summary : अनन्या पांडे और लक्ष लालवानी 'चांद मेरा दिल' में अभिनय करेंगे, जो करण जौहर द्वारा निर्मित और विवेक सोनी द्वारा निर्देशित एक रोमांटिक फिल्म है। यह फिल्म 22 मई, 2026 को रिलीज होने वाली है।

Web Title : Ananya Panday to romance Laksh Lalwani in 'Chand Mera Dil'.

Web Summary : Ananya Panday and Laksh Lalwani will star in 'Chand Mera Dil,' a romantic film produced by Karan Johar and directed by Vivek Soni. The movie is set to release on May 22, 2026.