मित्रांसोबत गोव्याला गेला अन् फोन विकावा लागला..; प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितला मजेशीर किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 14:14 IST2024-11-21T14:11:17+5:302024-11-21T14:14:37+5:30
बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सीने (Vikrant Massey) आपल्या टॅलेंटच्या जोरावर इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

मित्रांसोबत गोव्याला गेला अन् फोन विकावा लागला..; प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितला मजेशीर किस्सा
Vikrant Massey: बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सीने (Vikrant Massey) आपल्या टॅलेंटच्या जोरावर इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकताच अभिनेत्याचा 'द साबरमती रिपोर्ट' हा सिनेमा प्रदर्शित झाला. गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या गोध्रा ट्रेन अग्रीकांड प्रकरणानंतरच्या सत्य घटनेवर सिनेमा आधारित आहे. एकता कपूरने सिनेमाची निर्मिती केली असून धीरज सरना यांनी दिग्दर्शित केला आहे. विक्रांत मेस्सीने वेगवेगळ्या चित्रपटात काम केलंय. परंतु '12th Fail' या चित्रपटाने त्याला खरा स्टारडम मिळवून दिला. अभिनेत्याने असंख्य अडचणींवर मात इंस्डस्ट्रीत हक्काचं स्थान मिळवलं. सध्याच्या घडीला विक्रांत एका चित्रपटासाठी कोटींच्या घरात मानधन घेतो. परंतु अभिनेत्यावर आयुष्यात अशी वेळ आली होती जेव्हा पैशांसाठी त्याला फोन विकावा लागला होता. नक्की हे प्रकरण काय आहे? जाणून घेऊया.
नुकतीत विक्रांत मेस्सीने 'कर्लीटेल'ला दिलेल्या मुलाखतीत गोव्यातील एका ट्रिपचा किस्सा शेअर केला. विक्रांत मेस्सी या मुलाखतीत म्हणाला, "मी तेव्हा नुकताच कमवायला लागलो होतो. त्यावेळी माझ्यासोबत ५००० हजार रुपये घेऊन मी मित्रांसोबत गोव्याला वोल्वो बसने गेलो. मला आठवतंय गोवा ट्रिपचा तो शेवटचा दिवस होता. त्यावेळी आम्ही सगळे मित्र काही खर्च झाला तर त्याचे पैसै सगळे मिळून काढत होतो."
पुढे अभिनेत्याने सांगरितलं," पण, नेमकं शेवटच्या दिवशी माझ्याकडचे सगळे पैसे संपले आणि आम्हाला हॉटेलचं बिल द्यायचं होतं. हॉटेलचं बिल आणि परतीच्या प्रवासाचे तिकीट काढण्यासाठी पैसे नसल्यामुळे मी माझा मोबाईल विकला". असा खुलासा विक्रांतने मुलाखतीत केला.
विक्रांत मेस्सीने त्याच्या मेहनतीच्या जोरावर कोट्यवधींची संपत्तीचा मालक आहे. मीडिया रिपोर्टनुसार अभिनेत्याती एकुण संपत्ती २० ते २६ कोटी इतकी आहे.