टायगर श्रॉफ -संजय दत्तच्या 'बागी-४' चित्रपटावर सेन्सॉर बोर्डाची कात्री! 'त्या' सीन्सवर घेतला आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 12:41 IST2025-09-05T12:34:27+5:302025-09-05T12:41:17+5:30
टायगर श्रॉफ-संजय दत्तच्या 'बागी-४' चित्रपटावर सेन्सॉर बोर्डाची कात्री! 'त्या' सीन्सवर घेतला आक्षेप

टायगर श्रॉफ -संजय दत्तच्या 'बागी-४' चित्रपटावर सेन्सॉर बोर्डाची कात्री! 'त्या' सीन्सवर घेतला आक्षेप
Baghi 4 Movie: सध्या हिंदी सिनेविश्वात टायगर श्रॉफ आणि संजय दत्त यांच्या बागी-४ चित्रपटाचीच चर्चा सुरु आहे. २०१६ साली बॉक्स ऑफिस गाजवणारा बागी फ्रॅंचायझीच्या चित्रपटाचा चौथा भाग आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे सिनेरसिक प्रचंड उत्सुक आहेत. या चित्रपटात मिस युनिव्हर्स हरनास सांधू आणि सोनम बाजवा देखील मुख्य भूमिकेत दिसमार आहेत. हा चित्रपट आज ५ सप्टेंबर २०२५ ला रिलीज करण्यात आला आहे. मात्र, प्रदर्शनाच्या काही दिवस आधी सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील एका दृश्यावर आक्षेप घेतला आहे. तसेच सेन्सॉर बोर्डाने अनेक दृश्यांमध्ये बदल करण्याची मागणी केली आहे.
बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, साजिद नाडियाडवालाच्या बॅनरखाली बनवलेल्या या चित्रपटाला 'ए' प्रमाणपत्र मिळालं आहे. ‘बागी ४’ हा चित्रपट मागील भागांपेक्षा अधिक हिंसक आणि भावनिक असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, निर्मात्यांना चित्रपटातून काही दृश्य काढून टाकण्यास सांगितलं आहे. चित्रपटातील काही दृश्यांमुळे धार्मिक भावना दुखावू नये या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बागी-४ मधील काही आक्षेपार्ह संवाद आणि रक्तपाताची अनेक दृश्ये यावर सेन्सॉर बोर्डाने कात्री लावली आहे. आता या चित्रपटाचा रनटाईम २ तास ४३ मिनिटांवरून २ तास ३७ मिनिटांपर्यंत कमी करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. शिवाय हे काम लवकर करण्याची सूचना बोर्डाकडून केली आहे.
दरम्यान, 'बागी ४' मध्ये टायगर श्रॉफ पुन्हा एकदा 'रॉनी'च्या भूमिकेत दिसणार आहे. तर संजय दत्त खलनायकाची भूमिका साकारत आहे. त्याचं ह पात्र खूपच दमदार आणि भीतीदायक आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच त्याची तुलना रणबीर कपूरच्या ब्लॉकबस्टर 'अॅनिमल'शी केली जात होती आणि आता ही चर्चा आणखी तीव्र झाली आहे.