टायगर श्रॉफच्या 'बागी-४' ची धमाकेदार सुरुवात; पहिल्याच दिवशी जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 10:19 IST2025-09-06T10:17:05+5:302025-09-06T10:19:58+5:30

टायगर श्रॉफच्या 'बागी-४' ने पहिल्या दिवशी किती कमाई केली? आकडेवारी आली समोर

bollywood actor tiger shroff and sanjay dutt baaghi 4 movie box office collection day 1  | टायगर श्रॉफच्या 'बागी-४' ची धमाकेदार सुरुवात; पहिल्याच दिवशी जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला 

टायगर श्रॉफच्या 'बागी-४' ची धमाकेदार सुरुवात; पहिल्याच दिवशी जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला 

Baaghi 4 Box Office Collection Day 1 : मागील काही दिवसांपासून सिनेविश्वात ज्या चित्रपटाची चर्चा सुरु होती तो 'बागी-४' अखेर  प्रदर्शित झाला आहे. काल ५ सप्टेंबरच्या दिवशी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘बागी’ फ्रँचायझीचा हा चौथा भाग आहे. ए.हर्ष दिग्दर्शित या चित्रपटात टायगर श्रॉफ, संजय दत्त तसेच हरनाज सांधू, श्रेयस तळपदे, उपेंद्रा लिमये अशी तगडी स्टारकास्ट आहे.  या सिनेमात अभिनेता टायगर श्रॉफ एका नव्या आणि आधीच्या सिनेमांपेक्षा अधिक हिंसक भूमिकेत दिसत आहे. दिग्गज कलाकारांची मांदियाळी असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त ओपनिंग करत दबदबा निर्माण केला आहे. 

टायगर श्रॉफच्या 'बागी-४' चा चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच त्याची जोरदार चर्चा सुरु होती. त्यानंतर आता हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. याशिवाय  चित्रपटाने पहिल्या दिवसात बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली, याची आकडेवारी देखील समोर आली आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'बागी-४' चित्रपटाने जबरदस्त ओपनिंग करत पहिल्याच दिवशी १२ कोटींचा गल्ला जमवला आहे. एकंदरीत हा थ्रिलर चित्रपट एकूणच प्रेक्षकांना भावल्याचं दिसतंय. ही आकडेवारी सुरुवातीची असली तरी त्यामध्ये आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. शिवाय शनिवार-रविवारच्या सुट्टीचा फायदाही चित्रपटाला मिळू शकतो. 

'बागी-४' हा चित्रपट २०० कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. या चित्रपटात संजय दत्त मुख्य खलनायकाच्या भूमिकेत आहे .तर मिस युनिव्हर्स हरनाज संधू या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.‘बागी ४’ खूपच ॲक्शन-पॅक सिनेमा आहे. चित्रपटात टायगर श्रॉफचा ‘रॉनी’ नावाचा नायक एका वेगळ्या अवतारात दिसत आहे.

Web Title: bollywood actor tiger shroff and sanjay dutt baaghi 4 movie box office collection day 1 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.