"वाचताही यायचं नाही आणि..."; लहानपणी सनी देओलला झाला होता 'हा' गंभीर आजार, म्हणाला..
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 14:19 IST2025-06-24T14:16:30+5:302025-06-24T14:19:53+5:30
६७ वर्षीय सनी देओलने केलाय 'या' गंभीर आजाराचा सामना, म्हणाला- "मला लोक..."

"वाचताही यायचं नाही आणि..."; लहानपणी सनी देओलला झाला होता 'हा' गंभीर आजार, म्हणाला..
Sunny Deol: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा थोरला मुलगा सनी देओल
(Sunny Deol) इंडस्ट्रीतील आघाडीचा अभिनेता आहे. वडिलांच्या पाऊलांवर पाऊल ठेवत त्याने सिनेसृष्टीत स्वत: चा ठसा उमटवला आहे. बॉलिवूडचा अॅक्शन हिरो म्हणून ओळखला जाणाऱ्या अभिनेता एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. मात्र, वैयक्तिक आयुष्यात या अभिनेत्याने एका गंभीर आजाराचा सामना केला आहे. अलिकडेच अभिनेत्याने लहानपणापासूनच असलेल्या आजाराबद्दल खुलासा केला.
अलिकडेच 'झुम' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सनी देओलने त्याच्या आजारपणाबद्दल भाष्य केलं. लहानपणापासून सनी देओल डिस्लेक्सिया (Dyslexia) या गंभीर आजाराचा सामना केला. यापूर्वी एका सेशनदरम्यान अभिनेत्याने त्याला या आजारामुळे आजही स्क्रिप्ट वगैरे वाचण्यात अडचण येत असल्याचं सांगितलं होतं. त्याविषयी सांगताना सनी देओलनं म्हटलं, "जर तुम्ही अभ्यासात चांगले नसाल तर लोकांना वाटतं की तुम्हाला काहीच येत नाही. त्यामुळे लहानपणी जर मी अभ्यास करू शकलो नाही तर मला मार पडायचा. पण हे देखील खरं आहे की प्रत्येक मुलामध्ये काही ना काही वेगळेपण असतं. जर एखाद्या मुलाला माहित असेल की त्याला कोणत्या गोष्टीची आवड आहे, तर त्याने त्याच्या आयुष्यात तीच गोष्ट निवडावी आणि तीच करावी."
बालपणीच्या आठवणी सांगताना अभिनेत्याने म्हटलं ,"मी लहान असताना मला खेळांमध्ये खूप रस होता. शाळेत असताना मी प्रत्येक संघाचा भाग असायचो. असा कोणताही खेळ नव्हता ज्यामध्ये मी जो खेळलो नव्हतो. पण, त्या खेळाबद्दल मी कोणाशी काही बोललो की ते लोक माझ्यावर हसायचे. डिस्लेक्सिया असलेल्या लोकांना वाचनात अडचण येते आणि जर तुम्ही त्यांना टेलीप्रॉम्प्टर दिला तर वाचण्यात अडचण येते." असा खुलासा अभिनेत्याने केला.
दरम्यान,सध्या सनी देओल त्याचा आगामी बॉर्डर-मुळे प्रचंड चर्चेत आहे. त्याच्या सिनेमाबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.जवळपास २७ वर्षांनंतर 'बॉर्डर २' चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.