३० वर्षानंतरही क्रेझ कायम, सिनेमागृहात आजही 'या' चित्रपटाचा दबदबा; कुठे लागतो शो? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 16:18 IST2025-10-23T16:12:19+5:302025-10-23T16:18:24+5:30
३० वर्षानंतरही क्रेझ कायम, सिनेमागृहात आजही 'या' चित्रपटाचा दबदबा; 'हा' अभिनेता मुख्य भूमिकेत

३० वर्षानंतरही क्रेझ कायम, सिनेमागृहात आजही 'या' चित्रपटाचा दबदबा; कुठे लागतो शो? जाणून घ्या
Bollywood Cinema: ९० च्या दशकात आलेल्या या चित्रपटांचं गारुड अजूनही रसिकांच्या मनावर कायम आहे. त्यात शाहरुख खानच्या जुन्या चित्रपटांचा बॉलिवूडमध्ये एक वेगळा चाहतावर्ग आहे. अभिनेत्याने त्याच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले आहे. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे दिलवाले दुल्हनिया ले जायेगें. १९९५ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट चांगलाच गाजला.त्यावेळी ४ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने सुमारे १०० कोटी रुपये कमावले होते. सध्या या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
आदित्य चोप्रा दिग्दर्शित 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या चित्रपटात शाहरुख-काजोलसह अमरीश पुरी, फरीदा जलाल, अनुपम खेर और करण जौहर अशा कलाकारांची फळी पाहायला मिळाली. हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास ३० वर्षांचा काळ लोटला आहे. तरीही या चित्रपटाची क्रेझ अजूनही चाहत्यांमध्ये कायम आहे. आजही मुंबईतील मराठा मंदिर सिनेमागृहात हा चित्रपट प्रेक्षकांसाठी दाखवण्यात येतो.
मिळालेल्या माहितीनुसार,'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून आजपर्यंत, जवळजवळ ३० वर्षांपासून, हा चित्रपट सकाळी ११:३० वाजता दाखवला जात आहे. कॉलेजचे विद्यार्थी, नवविवाहित जोडपे आणि प्रेमी युगुलांसह इतरही चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करतात ही आश्चर्याची बाब आहे. गेल्या ३० वर्षांपासून हे नाटक सतत थिएटरमध्ये दाखवले जात आहे आणि आजही त्याचे तिकीट दर फक्त ३० आणि ५० रुपये आहेत.
'दिलवाले दुल्हनिया ले जायेगे' या चित्रपटातून अभिनेता शाहरुख खान आणि काजोलच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यांनी आजवर अनेक रोमॅंटिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे आणि त्यातील बरेच चित्रपट हिट ठरले आहेत.