फुल फायर! शाहिद कपूरच्या 'देवा' चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज, अभिनेत्याचा लूक पाहून चाहते हैराण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 16:06 IST2025-01-05T16:04:54+5:302025-01-05T16:06:11+5:30

शाहिद कपूरच्या (Shahid Kapoor) बहुप्रतीक्षित 'देवा' चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.

bollywood actor shahid kapoor deva movie teaser out now know about release date | फुल फायर! शाहिद कपूरच्या 'देवा' चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज, अभिनेत्याचा लूक पाहून चाहते हैराण 

फुल फायर! शाहिद कपूरच्या 'देवा' चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज, अभिनेत्याचा लूक पाहून चाहते हैराण 

Shahid Kapoor Deva Teaser:  शाहिद कपूरच्या (Shahid Kapoor) बहुप्रतीक्षित हाय-ॲक्शनपट 'देवा' चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या टीझरने सिनेरसिकांचं लक्ष वेधलं आहे. शिवाय टीझरमध्ये शाहिदने त्याचे अ‍ॅक्शन सीन्स, स्टंटबाजीसोबत आपल्या डान्सने देखील पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.


'देवा' मधील शाहिद कपूर अ‍ॅग्री यंग मॅन लूक पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाचं कथानक एका पोलीस अधिकाऱ्याच्या कहाणीवर आधारित असणार आहे. ज्याचं नाव देव असं आहे. या कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत शाहिद कपूर प्रेक्षकांना 'देवा' चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. 

शाहिद कपूरने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. अभिनेत्याने शेअर केलेल्या टीझवर त्याचे चाहते लाईक्स आणि कमेंट्स करत प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. त्यावर एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलंय, 'अप्रतिम ॲक्शन' तर आणखी एका चाहत्याने लिहिलंय, 'शाहिद कपूर त्याच्या जुन्या अवतारात परतला.'

शाहिदचा आगामी देवा कधी होतोय रिलीज?

शाहिद कपूरचा आगामी 'देवा' सिनेमा ३१ जानेवारी २०२५ ला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. शाहिद कपूरच्या 'देवा' या सिनेमाचं दिग्दर्शन प्रसिद्ध मल्याळम दिग्दर्शक रोशन एंड्रयूज यांनी केलं आहे. शिवाय झी स्टुडिओ आणि सिद्धार्थ रॉय कपूर यांनी याची निर्मिती केली आहे. या सिनेमामुळे शाहिद कपूर जवळपास वर्षभरानंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करतो आहे. शाहिदसोबत या सिनेमात पूजा हेगडे अभिनेत्री म्हणून झळकणार आहे.

Web Title: bollywood actor shahid kapoor deva movie teaser out now know about release date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.