शाहिद कपूरच्या 'देवा' चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्यांना सेन्सॉरची कात्री; रनटाईममध्येही होणार बदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 11:19 IST2025-01-28T11:10:02+5:302025-01-28T11:19:48+5:30
सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) सध्या त्याचा आगामी चित्रपट 'देवा' मुळे चर्चेत आहे.

शाहिद कपूरच्या 'देवा' चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्यांना सेन्सॉरची कात्री; रनटाईममध्येही होणार बदल
Deva Cinema: सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) सध्या त्याचा आगामी चित्रपट 'देवा' मुळे चर्चेत आहे. येत्या ३१ जानेवारीला हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित केला जाणार आहे. अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) 'देवा' मध्ये शाहिदसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. अगदी काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. त्यानंतर 'भसड मचा' हे गाणं सुद्धा रिलीज करण्यात आलं या गाण्याला प्रेक्षकांची चांगली दाद मिळाली. दरम्यान, या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. शाहिद कपूर यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. परंतु प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाच्या अडचणीत वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. 'देवा' मधील काही सीन्सवर सेन्सॉर बोर्डने आक्षेप नोंदवला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, सेन्सॉर बोर्डने या चित्रपटामधील काही सीन्समध्ये तीन मुख्य बदल करण्याचा सल्ला दिला आहे. सेन्सॉरकडून चित्रपटातील शाहिद आणि पूजा हेगडेमधील एक इंटिमेट सीनवर आक्षेप नोंदवला आहे. शिवाय तो सीन कट करुन त्यामधील ६ सेकंद कमी करण्यास सांगितलं आहे. याशिवाय त्यातील काही आक्षेपार्ह एक्सप्रेशन्स आणि डायलॉग्ज सुद्धा बदलण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे 'देवा' चित्रपटाचा रनटाईम आता २ तास ३६ मिनिटे आणि ५९ सेकंद इतका असेल.
'देवा' सिनेमा ३१ जानेवारी २०२५ ला रिलीज होणार आहे. 'कमीने' सिनेमानंतर अनेक दिवसांनी शाहिद ग्रे शेड भूमिकेत बघायला मिळणार आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कशी कामगिरी करतो, याची सर्वांना उत्सुकता आहे. उत्तम सिनेमॅटोग्राफी, अॅक्शन सीन्स आणि त्याला भावनिक जोड या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन प्रसिद्ध मल्याळम दिग्दर्शक रोशन एंड्रयूज यांनी केलं आहे. शिवाय झी स्टुडिओ आणि सिद्धार्थ रॉय कपूर यांनी याची निर्मिती केली आहे. या सिनेमामुळे शाहिद कपूर जवळपास वर्षभरानंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करतो आहे.