'प्यार किया तो डरना क्या'मध्ये अरबाज खानच्या जागी दिसला असता 'हा' बॉलिवूड सुपरस्टार; का नाकारली ऑफर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 13:23 IST2024-12-30T13:19:08+5:302024-12-30T13:23:43+5:30

अभिनेता संजय दत्तने 'या' कारणामुळे नाकारली सलमानच्या सुपरहिट चित्रपटाची ऑफर.

bollywood actor sanjay dutt got offer of salman khan pyaar kiya toh darna kya movie but he was rejected the offer know the reason   | 'प्यार किया तो डरना क्या'मध्ये अरबाज खानच्या जागी दिसला असता 'हा' बॉलिवूड सुपरस्टार; का नाकारली ऑफर?

'प्यार किया तो डरना क्या'मध्ये अरबाज खानच्या जागी दिसला असता 'हा' बॉलिवूड सुपरस्टार; का नाकारली ऑफर?

Pyaar Kiya Toh Darna Kya Movie : बी-टाऊनमधील जिगरी मित्र म्हणून सलमान खान (Salman Khan) आणि संजय दत्त (Sanjay Dutt) यांच्याकडे पाहिलं जातं. या दोन्ही सुपरस्टार्सचा दोस्ताना सर्वश्रूत आहे. शिवाय काही सुपरहिट सिनेमांमध्ये त्यांनी एकत्र काम देखील केलंय. त्याचबरोबर सलमान खानच्या गाजलेल्या 'प्यार किया तो डरना क्या' या चित्रपटासाठी संजय दत्तला विचारणा करण्यात आली होती. साल १९९८ मध्ये हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. परंतु अभिनेत्याने या चित्रपटात काम करण्यासाठी नकार दिला होता.

अभिनेता सलमान खान मुख्य भूमिकेत असलेला 'प्यार किया तो डरना क्या' हा सिनेमा त्याकाळी प्रचंड गाजला. सोहेल खान दिग्दर्शित या रोमकॉम चित्रपटाला प्रेक्षकांची वाहवा मिळाली. सलमानसह या सिनेमात अरबाज खान, काजोल आणि धर्मेंद्र यांसारखी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली. अभिनेता अरबाज खानने चित्रपटात विशाल ठाकूर नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. मीडियारिपोर्टनुसार, अरबाज खानच्या या रोलसाठी पहिल्यांदा संजय दत्तच्या नावाला दिग्दर्शकाची पसंती होती. परंतु बिझी शेड्यूलमुळे अभिनेत्याने ही ऑफर नाकारली. 

या कारणामुळे संजय दत्तने 'प्यार किया तो डरना क्या' ची ऑफर केली रिजेक्ट

'प्यार किया तो डरना क्या' सिनेमादरम्यान अभिनेता संजय दत्त 'दाग-द फायर' आणि 'कारतूस' या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. आपल्या व्यग्र वेळापत्रकामुळे अभिनेत्याने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. त्यामुळे या चित्रपटात अखेर विशाल ठाकूरच्या भूमिकेसाठी अरबाज खानची निवड करण्यात आली. 

Web Title: bollywood actor sanjay dutt got offer of salman khan pyaar kiya toh darna kya movie but he was rejected the offer know the reason  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.