शर्ट न घालता सलमानने का केलं होतं 'ओह ओह जाने जाना' गाण्याचं शूट? 'हे' आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 12:55 IST2025-01-15T12:49:52+5:302025-01-15T12:55:10+5:30
बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खान (Salman Khan) कायमच त्याच्या फिक्मी करिअरमुळे चर्चेत येत असतो.

शर्ट न घालता सलमानने का केलं होतं 'ओह ओह जाने जाना' गाण्याचं शूट? 'हे' आहे कारण
Salman Khan: बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खान (Salman Khan) कायमच त्याच्या फिक्मी करिअरमुळे चर्चेत येत असतो. सलमान त्याचा अभिनय, स्टाईल आणि हटके अंदाज या सगळ्या गोष्टींमुळे लोकप्रिय झाला आहे. सलमान खानने अनेक सुपरहिट सिनेमे इंडस्ट्रीला दिले आहेत. 'प्यार किया तो डरना क्या' हा चित्रपट त्यापैकी एक आहे. १९९८ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. दरम्यान, 'प्यार किया तो डरना क्या' मधील 'ओह ओह जाने जाना' हे गाणं चांगलचं गाजलं होतं. या गाण्यामध्ये सलमानने शर्टलेस परफॉर्मन्स केला होता. यामागे काही कारणही होतं, याचा खुलासा खुद्द अभिनेत्याने एका शोमध्ये केला होता.
सलमान खानने 'सा रे गा मा पा' या सिंगिंग रिअॅलिटी शोमध्ये 'ओह ओह जाने जाना' गाण्याच्या शूटिंग दरम्यानचा एक किस्सा शेअर केला. शर्ट न घालता अभिनेता हे गाणं शूट केलं होतं. यामागे काही कारण होतं असं त्याने सांगितलं. या गाण्यासाठी अभिनेत्याला देण्यात आलेला शर्टची साइज कमी असल्याने तो शर्ट त्याने घातला नाही. या शोमध्ये सलमान खानने सांगितलं की, "हे गाणं जवळपास ६ वर्ष सीडीमध्ये होतं. बऱ्याच म्युझिक कंपन्यांकडून गाणं रिजेक्ट करण्यात आलं होतं. मला हे गाणं प्रचंड आवडलं, त्यामुळे माझ्या आगामी चित्रपटासाठी ते घ्यायचं असा माझा विचार होता. मग मी सोहेलसोबत यासंदर्भात बोललो."
पुढे सलमान म्हणाला, "या गाण्याचं शूट आम्ही मढमध्ये करत होतो. त्यावेळी माझे जे कॉस्च्यूम डिझायनर होते त्यांनी शर्ट डिझाइन केला होता. पण तो शर्ट मला एकदम फिट वाटत होता. पुन्हा तो शर्ट रिसाइज करेपर्यंत बराच वेळ गेला असता. त्यासाठी मी सोहेलला म्हणालो की हे गाणं मी शर्ट न घालता शूट केलं तर चालेल का? पहिल्यांदा सोहेलला माझ्या बोलण्यावर काही विश्वास नव्हता, मग जेव्हा आम्ही गाण्याचं शूट मॉनिटरवर पाहिलं त्यावेळी ते गाणं सगळ्यांना आवडलं. अशा पद्धतीने आम्ही 'ओह ओह जाने जाना' गाण्याची शूटिंग केली.
सोहेल खान दिग्दर्शित या रोमकॉम चित्रपटाला प्रेक्षकांची वाहवा मिळाली. सलमानसह या सिनेमात अरबाज खान, काजोल आणि धर्मेंद्र यांसारखे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाचं कथानक आणि त्यातील गाणी आजही प्रेक्षकांच्या तोंडपाठ आहेत.