ही दोस्ती तुटायची नाय! १८ वर्षानंतर सलमान-गोविंदाची जोडी एकत्र झळकणार, मोठी अपडेट समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 14:56 IST2025-10-28T14:45:53+5:302025-10-28T14:56:17+5:30
सलमान-गोविंदाची जोडी पुन्हा एकत्र? चाहत्यांची उत्सुकता शिगेला

ही दोस्ती तुटायची नाय! १८ वर्षानंतर सलमान-गोविंदाची जोडी एकत्र झळकणार, मोठी अपडेट समोर
Salman And Govinda Reunion:सलमान खान आणि गोविंदा या अभिनेत्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीचा एक काळ गाजवला. ९० च्या दशकातील हिंदी सिनेविश्वातील ते टॉपच्या नायकांपैकी एक आहेत. सलमानची अॅक्शन आणि गोविंदाची विनोदी शैलीचे लाखो-करोडो चाहते आहेत. दरम्यान, २००७ साली आलेल्या डेव्हिड धवन यांच्या
‘पार्टनर’या सिनेमात ही जोडी एकत्र दिसली होती. त्यानंतर गोविंदा अभिनयक्षेत्रापासून दूर आहे. आता जवळपास १८वर्षानंतर सलमान खान व गोविंदा पुन्हा एकदा एकत्र दिसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सलमान व गोविंदा यांनी 'दिवाना-मस्ताना','मिस्टर अँड मिसेस खन्ना'या चित्रपटात भूमिका केल्या आहेत. त्यानंतर या दोघांना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्याची चाहत्यांची इच्छा होती. चाहत्यांची ही इच्छा अखेर पूर्ण होणार आहे. मिडिया रिपोर्टनुसार, गोविंदा आणि सलमान खान यांच्या चाहत्यांनी दोघांना मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार असल्याची माहिती मिळते आहे. या प्रोजेक्टबद्दलची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे.अलिकडेच बिग बॉस १९ च्या एका एपिसोडमध्ये सलमानने तो गोविंदासोबत आगामी प्रोजेक्टमध्ये एकत्र काम करणार असल्याची हिंट दिली आहे. त्यामुळे सिनेरसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, याबाबत सलमान किंवा गोविंदाने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
सलमान आणि गोविंदाची जोडी त्यांच्या उत्तम कॉमिक टायमिंगसाठी ओळखली जाते. डेव्हिड धवन यांची निर्मिती असलेल्या पार्टनर या सिनेमात ही जोडी एकत्र दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता. गोविंदा व सलमान एकत्र आल्यास दोघांच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची पर्वणीच ठरणार आहे. यापूर्वी २०११ मध्ये देखील पार्टनरचा सिक्वलच्या चर्चा रंगल्या होत्या मात्र चर्चे व्यतिरिक्त काहीच झालं नाही.