दिसायला कमाल सुंदर, बॉलिवूड नट्यांना देतेय टक्कर! कोण आहे 'सैयारा'च्या अभिनेत्याची गर्लफ्रेंड श्रुती चौहान?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 13:11 IST2025-07-22T13:07:00+5:302025-07-22T13:11:11+5:30
सौंदर्यात बॉलिवूड अभिनेत्रींना देतेय टक्कर! कोण आहे श्रुती चौहान? 'सैयारा' फेम अहान पांडेसोबत जोडलं जातंय नाव जाणून घ्या...

दिसायला कमाल सुंदर, बॉलिवूड नट्यांना देतेय टक्कर! कोण आहे 'सैयारा'च्या अभिनेत्याची गर्लफ्रेंड श्रुती चौहान?
Ahaan Pandey Love Life: मोहित सुरी दिग्दर्शित 'सैयारा' या चित्रपटाने इंडियन बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. प्रदर्शनाच्या ४ दिवसांतच या चित्रपटाने विक्रमी कमाई करते नवे रेकॉर्ड्स रचले आहेत. दरम्यान, बहुचर्चित चित्रपटातून अहान पांडे अनीत पड्डा हे नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. पदार्पणाच्या पहिल्याच चित्रपटातून या जोडी प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरली आहे. अनेक चित्रपट समीक्षक तसेच बॉलिवूड कलाकारांनी अहान आणि अनीत पड्डाच्या कामाचं कौतुक केलंय. अशातच आता अभिनेत्याच्या लव्ह लाईफबद्दल चर्चा होऊ लागली आहे.
'सैयारा' अभिनेता अहान पांडेचे नाव सध्या मॉडेल आणि अभिनेत्री श्रुती चौहानसोबत जोडले जात आहे. सैयारा च्या यशानंतर मॉडेल श्रुती चौहानने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अहानचं कौतुक केलं. त्यानंतर अहान आणि श्रुतीच्या रिलेशनशिपच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत. दरम्यान, या दोघांपैकी कोणीही याबद्दल कधीही उघडपणे सांगितलं नाही. पण, अलिकडेच अभिनेत्रीने चित्रपटावर तिची प्रतिक्रिया देऊन सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
कोण आहे श्रुती चौहान?
श्रुती चौहानबद्दल सांगायचं झालं तर ती एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. श्रुतीने जोया अख्तर यांच्या गली बॉय चित्रपटात काम केलं आहे. श्रुती ही मुळची जयपूरची आहे. आणि तिने ज्योती विद्यापीठ महाविद्यालयातून कला शाखेचे शिक्षण घेतलं आहे. याशिवाय श्रुती गायक जुबिन नौटियालसोबत 'हद से' या म्युझिक व्हिडिओमध्ये झळकली.