जीवघेण्या हल्ल्यानंतर सैफ अली खानचं दमदार कमबॅक: 'The Jewel Thief'मधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 18:37 IST2025-02-03T18:32:23+5:302025-02-03T18:37:18+5:30
अभिनेता सैफ अली खान (Saif Ali khan) त्याच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर प्रचंड चर्चेत आला.

जीवघेण्या हल्ल्यानंतर सैफ अली खानचं दमदार कमबॅक: 'The Jewel Thief'मधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Saif Ali khan: अभिनेता सैफ अली खान (Saif Ali khan) त्याच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर प्रचंड चर्चेत आला. सैफवर हल्ला झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. १६ जानेवारीला एका बांगलादेशी घुसखोराने घरात घुसून चाकूने हल्ला केला होता. यामध्ये सैफ गंभीर जखमी झाला होता.या घटनेनंतर मुंबईत मोठी खळबळ उडली. या हल्ल्यामध्ये अभिनेत्याच्या मानेला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर सैफवर लिलावती रुग्णालयात अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सध्या सैफ रुग्णालयातून घरी परतला असून बरा होत आहे. दरम्यान, या प्रकरणानंतर आता सैफ अली खान पहिल्यांदा माध्यमांसमोर आला आहे. याचं कारण म्हणजे सैफ लवकर 'The Jewel Thief' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
जीवघेण्या हल्ल्यानंतर सैफ दमदार कमबॅक करत प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. यादरम्यान, सैफने सुद्धा हजेरी लावली. 'The Jewel Thief' मध्ये चित्रपटाध्ये सैफ अली खानसोबत अभिनेता जयदीप अहलावत पहिल्यांदा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित होणार आहे. 'The Jewel Thief' मध्ये सैफ अली खान एका चोराच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
रॉबी ग्रेवाल यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तर सिद्धार्थ आनंद चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटाची कथा ५०० कोटी रुपयांच्या हिऱ्यांच्या चोरीवर आधारित आहे. ज्यामध्ये सैफ अली खान आणि जयदीप अहलावत वेगळ्याच अंदाजात दिसत आहेत.