'धुरंधर'मध्ये दिसणार नवा चेहरा! २० वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रणवीर करणार रोमान्स, कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 14:08 IST2025-06-20T13:56:21+5:302025-06-20T14:08:32+5:30

२० वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रणवीर करणार रोमान्स, कोण आहे ती?

bollywood actor ranveer singh dhurandhar movie update actress sara arjun will play female lead says report | 'धुरंधर'मध्ये दिसणार नवा चेहरा! २० वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रणवीर करणार रोमान्स, कोण आहे ती?

'धुरंधर'मध्ये दिसणार नवा चेहरा! २० वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रणवीर करणार रोमान्स, कोण आहे ती?

Ranveer Singh Dhurandhar Update: अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh)  हा त्याच्या वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. 'बँड बाजा बरात'सारख्या चित्रपटातून सुरुवात करणाऱ्या रणवीर सिंहने सिनेसृष्टीत त्याची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. लवकरच रणवीर आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून सगळीकडेच चर्चा आहे. या मल्टिस्टारर चित्रपटात रणवीरसह, अर्जून रामपाल, संजय दत्त अशा कलाकारांची फौज आहे. परंतु, धुरंदर मध्ये रणवीरसोबत मुख्य नायिकेची भूमिका कोण साकारणार याबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. त्यात बरीच नावंही समोर आली होती. 

दरम्यान, मीडिया रिपोर्टनुसार, 'धुरंधर' चित्रपटात  अभिनेत्री सारा अर्जुनची वर्णी लागली आहे. 'धुरंधर'मध्ये सारा अर्जुन दिसण्याची दाट शक्यता आहे. रणवीर सिगं १९ वर्षीय अभिनेत्री सारा अर्जुनसोबत पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहे. दोघांमधील वयामध्ये जवळपास २० वर्षांचं अंतर आहे त्यामुळे सोशल मीडिया यूजर्सनी ट्रोल करायला सुरुवात केली आहे. शिवाय काही चाहते निराश देखील झाले आहेत. परंतु. निर्मात्यांकडून अद्याप याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

कोण आहे सारा अर्जुन?

सारा अर्जुन ही मुळची मुंबईची रहिवासी आहे. 2005 मध्ये तिचा जन्म झाला. याआधी साराने इमरान हाश्मीच्या 'एक थी डायन' या हॉरर चित्रपटात काम केले आहे. याशिवाय, ती सलमान खानच्या 'जय हो' चित्रपटात एका शाळकरी मुलीची भूमिका साकारताना दिसली आहे. परंतु सारा अर्जुनला ऐश्वर्या रायच्या 'PS2' चित्रपटातून लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात तिने ऐश्वर्याच्या बालपणीची म्हणजेच नंदिनीची भूमिका साकारली होती.

Web Title: bollywood actor ranveer singh dhurandhar movie update actress sara arjun will play female lead says report