VIDEO: संस्कार असावेत तर असे! रणबीर-आलियाच्या 'त्या' कृतीचं होतंय कौतुक, नेटकरी म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 15:14 IST2025-02-22T15:10:20+5:302025-02-22T15:14:57+5:30
सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीत लगीनघाई सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

VIDEO: संस्कार असावेत तर असे! रणबीर-आलियाच्या 'त्या' कृतीचं होतंय कौतुक, नेटकरी म्हणाले...
Alia Bhatt And Ranbir Kapoor: सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीत लगीनघाई सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या कपूर घराण्यात सनईचौघडे वाजत आहेत. त्यामुळे कपूर कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण आहे. रणबीर कपूरचा भाऊ आदर जैन नुकताच लग्नबंधात अडकला. आदर जैनने शुक्रवारी (२१ फेब्रुवारी) मुंबईत लग्न केलं. आदरने त्याची गर्लफ्रेंड अलेखा अडवाणीबरोबर लग्न करुन आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. अगदी महिनाभरापूर्वी आदर आणि अलेखा यांनी १२ जानेवारीला गोव्यात लग्न ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं होतं. आता त्यांनी हिंदू रितीरिवाजानूसार पारंपरिक पद्धतीने विवाहबंधनात अडकले आहेत. याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. दरम्यान, त्यांच्या मेहंदी सोहळ्यातील आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor)एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
अभिनेता आदर जैन आणि आलेखा अडवाणी यांच्या विवाहसोहळ्यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची मांदियाळी होती. याच दरम्यानचा आलिया आणि रणबीरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये हे जोडपं घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घेताना दिसत आहेत. रणबीर आणि आलिया प्रत्येक सदस्याच्या जवळ जाऊन खाली वाकून त्यांच्या पाया पडत आहेत. त्यांच्या या कृतीचं नेटकऱ्यांकडून कौतुक होतं आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्यांनी 'आदर्श जोडपं' असा टॅग सुद्धा दिला आहे.
मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर आदर जैन आणि आलेखा अडवाणी यांच्या लग्नाची जोरदार चर्चा होती. त्यांच्या या लग्नाला करीना कपूर, सैफ अली खान, करिश्मा कपूर, नीतू कपूर, रणबीर व आलिया, रिद्धीमा कपूर, तिची लेक समायरा, श्वेता बच्चनचे पती निखिल नंदा व त्यांचा मुलगा अगस्त्य नंदा, अनिल अंबानी व टीना अंबानी, आकाश अंबानी व श्लोका मेहता यांनी हजेरी लावली होती.
दरम्यान, आदर जैनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायंच झालं तर त्याने 'कैदी बँड', 'मोगुल' आणि 'हॅलो चार्ली' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याशिवाय अभिनेता तारा सुतारियासोबतच्या रिलेशनशिपमुळे देखील अनेकदा चर्चेत आला.