१० सेकंदाचा डायलॉग अन् करिअर संपलं; श्रीदेवीचा 'हा' अभिनेता नाव बदलून जगतोय 'असं' आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 13:29 IST2025-07-23T13:25:11+5:302025-07-23T13:29:21+5:30
१० सेंकदांच्या डायलॉगने करिअर बर्बाद; श्रीदेवीचा पती साकारणारा 'हा' अभिनेता नाव बदलून परदेशात जगतोय 'असं' आयुष्य

१० सेकंदाचा डायलॉग अन् करिअर संपलं; श्रीदेवीचा 'हा' अभिनेता नाव बदलून जगतोय 'असं' आयुष्य
Lamhe Movie: अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) हे हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानावर येतं. मिस हवाहवाई म्हणून चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्रीचा चाहत्यांमध्ये घट झालेली नाही. या नायिकेसोबत काम करण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असायचा. त्या एखाद्या नवख्या कालाकाराला श्रीदेवीसोबत काम करण्याची संधी मिळणं एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखंच आहे. असाच एक अभिनेता ज्याने करिअरमधील पहिल्याच चित्रपटात श्रीदेवी यांच्यासोबत काम केलं, पण, त्याचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आदळला आणि या मॉडेलचं अभिनयातील करिअर संपलं.
या मॉडेल, अभिनेत्याचं नाव म्हणजे दीपक मल्होत्रा. त्याने श्रीदेवी यांच्याबरोबर लम्हें या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. चित्रपटात श्रीदेवींची दुहेरी भूमिका होती.
मॉडेलिंगमध्ये यश मिळाल्यानंतर, दीपक मल्होत्रा आता बॉलिवूडमध्येही आपले नाव कमवेल असं अनेकांना वाटलं. परंतु 'लम्हे' नंतर त्याला चित्रपटांच्या फार काही ऑफर मिळाल्या नाहीत. एका छोट्या भूमिकेमुळे आणि एका १० सेकंदाच्या डायलॉगमुळे त्याच्या करिअरला उतरती कळा लागली. शिवाय या अभिनेत्याला अनेक चित्रपटांमध्ये रिप्लेस करण्यात आलं. त्याचबरोबर त्याला देश सोडण्यास भाग पाडण्यात आलं.
कोण आहे दीपक मल्होत्रा?
दीपक मल्होत्राचा जन्म हा बंगळुरूमध्ये झाला. ८० च्या दशकामध्ये त्याने रॅम्प मॉडेल म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. तो त्याकाळी देशातील सर्वाधिक मानधन घेणारा मॉडेल होता. त्याच काळात त्याला चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या आणि दीपकने यश चोप्रा दिग्दर्शित ‘लम्हे’ हा रोमँटिक चित्रपट पदार्पणासाठी निवडला.'विमल'साठी त्याने १९८७ साली तब्बल १.५ लाख रुपये मानधन घेतलं होतं. त्यामुळे तो प्रचंड चर्चेत आला होता. पण, अभिनय क्षेत्रीतील त्याची कारकीर्द पूर्णपणे फ्लॉप ठरली.
आता दीपक मल्होत्रा डिनो मार्टेली नावाने ओळखला जातो. त्याने आपलं नावही बदललं आहे. आता तो त्याच्या पत्नी आणि दोन मुलांसह न्यू यॉर्कमध्ये राहतो आणि परदेशात व्यवसाय कपड्यांचा करतो आहे.