वयाच्या 72 व्या वर्षी मिथुन चक्रवर्तींचा सळसळता उत्साह; 41 वर्षानंतर पुन्हा धरला 'डिस्को डान्सर'वर ताल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 18:20 IST2023-04-17T18:19:40+5:302023-04-17T18:20:26+5:30
Mithun Chakraborty: सध्या सोशल मीडियावर मिथुन चक्रवर्ती यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते त्यांच्या गाजलेल्या I Am a Disco Dancer या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

वयाच्या 72 व्या वर्षी मिथुन चक्रवर्तींचा सळसळता उत्साह; 41 वर्षानंतर पुन्हा धरला 'डिस्को डान्सर'वर ताल
बॉलिवूडचा ‘डिस्को डान्सर’ म्हणून एकेकाळी लोकांनी ज्याला डोक्यावर घेतलं तो हिरो म्हणजे मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty). उत्तम अभिनयासह आपल्या हटके डान्स स्टाइलमुळे मिथुनने 80-90 चा काळ चांगलाच गाजवला. त्या काळात त्याचा 'डिस्को डान्सर' हा त्याचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. केवळ हा सिनेमाच नाही तर त्यातील I Am a Disco Dancer या गाण्याने आणि त्यात मिथुनने केलेल्या डान्सने तर प्रेक्षकांना अशरक्ष: वेडं केलं होतं. हे गाणं आजही लोक तितक्याच आवडीने ऐकतात. विशेष म्हणजे तब्बल 41 वर्षानंतर मिथुनदाने या गाण्यावर पुन्हा ताल धरला केलं आहे.
सध्या सोशल मीडियावर मिथुन चक्रवर्ती यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते त्यांच्या गाजलेल्या I Am a Disco Dancer या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. वयाच्या 72 व्या वर्षी मिथुन यांनी डान्स केल्यामुळे त्यांचा उत्साह पाहून अनेकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसंच त्यांच्या एनर्जीला दाद दिली आहे.
दरम्यान, 1982 मध्ये मिथुन यांच्या ‘डिस्को डान्सर’ सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धमाका केला आणि तेव्हापासून इंडस्ट्रीला एक डिस्को डान्सर मिळाला. खऱ्या अर्थाने या सिनेमाने मिथुन यांना यश व लोकप्रियता मिळवून दिली.