"दुसऱ्यांच्या पैशांवर असे निर्णय घेणं...", ८ तास काम करण्याच्या मागणीवर बॉलिवूड अभिनेत्याचं स्पष्ट वक्तव्य, दीपिकावर साधला निशाणा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 09:13 IST2026-03-07T09:11:52+5:302026-03-07T09:13:13+5:30
"तुम्हाला कामाच्या वेळेवर नियंत्रण हवे असेल, तर...",बॉलिवूड कामाच्या तासाच्या मागणीबद्दल अभिनेता स्पष्टच बोलला

"दुसऱ्यांच्या पैशांवर असे निर्णय घेणं...", ८ तास काम करण्याच्या मागणीवर बॉलिवूड अभिनेत्याचं स्पष्ट वक्तव्य, दीपिकावर साधला निशाणा?
Kunal Khemu On Working Hour: बॉलिवूड इंडस्ट्रीत मागील काही महिन्यांपासून कामाच्या तासांबद्दल अनेक वादविवाद सुरु आहेत. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने संदीप रेड्डी वांगा यांच्या स्पिरिट या चित्रपटातून कामाच्या तासांची अट मान्य न केल्यामुळे एक्झिट घेतली. त्यानंतर हा विषय प्रकर्षाने चर्चेत आला. त्यात आता या मुद्यावर एका लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्याने आपलं मत मांडलं आहे. हा अभिनेता म्हणजे कुणाल खेमू आहे.
दरम्यान, संदीप रेड्डी वांगा यांच्या स्पिरिट चित्रपटाचं शूट सुरु होण्यापूर्वी आपण दिवसाला फक्त आठ तास काम करणार अशी अट दिग्दर्शकासमोर ठेवली होती. अखेरीस एकमत न झाल्याने दीपिकाने या प्रोजेक्टमधून माघार घेतली. यावरून मनोरंजन विश्वात मोठी चर्चा रंगली. अनेकजण या मुद्यावर आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.अभिनेता कुणाल खेमुने या प्रकरणी त्याचं मत व्यक्त केलं आहे. तसेच आठ तासांच्या कामाच्या शिफ्टसाठी त्याने दीपिकाला पाठिंबा दिला आहे. सोहा अली खानच्या पॉडकास्टमध्ये अभिनेत्याने फिल्म इंडस्ट्रीतील कामाच्या पद्धतीबद्दल भाष्य केलं आहे. यावेळी अभिनेता म्हणाला,"आपण मोठे झालो की आयुष्यात आपल्याला काय व्हायचं आहे हे देखील आपण ठरवतो. एकदा तुम्ही काम करायला लागल्यावर त्याबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्या आणि अपेक्षा देखील स्वीकाराव्या लागत असतात. कधीकधी लोक म्हणतात की त्यांना फक्त मर्यादित तास काम करायचे आहे आणि उर्वरित वेळ इतरत्र घालवायचा आहे, परंतु नंतर तुम्ही अशी नोकरी निवडावी जिथे हे शक्य होईल.कधीकधी लोक म्हणतात की त्यांना फक्त मर्यादित तास काम करायचे आहे आणि उर्वरित वेळ इतर गोष्टी करण्यात घालवायचा आहे. असं असेल तर तुम्ही सुरुवातीलाच त्या पद्धतीचं क्षेत्र निवडायला पाहिजे. "
कुणाल पुढे म्हणाला, "आताच्या पिढीच्या या अपेक्षा वाढल्या आहेत. आजकाल लोक कामापेक्षा ऐषारामाचं आयुष्य हवं आहे.जर एखाद्याला कमी तास काम करायचे असेल तर तो त्यांचा निर्णय आहे, परंतु नंतर जास्त पगारही हवा आहे, अशी अपेक्षा करणं देखील चुकीचं आहे. कारण,या दोन्ही गोष्टी जुळून येतील हे सुद्धा सांगता येत नाही."
कामाच्या वेळेवर नियंत्रण हवे असेल, तर...
मग अभिनेता म्हणाला,"ज्याना त्यांच्या कामाच्या वेळेवर नियंत्रण हवे आहे ते स्वतःचे चित्रपट तयार करण्यासारख्या अतिरिक्त जबाबदाऱ्या घेऊ शकतात. तुम्ही दिवसाला आठ तास काम करायचं असल्यास मग चार तास काम करू शकता. मग तुम्ही निर्माता बना, स्वतःचे पैसे गुंतवा आणि स्वतःचे निर्णय घ्या.जर तुम्ही निर्माते असाल आणि दिवसातून दोन तास काम करायचे ठरवले तर तुमचा प्रोजेक्ट चित्रपट पूर्ण होणं अशक्य आहे, आणि त्यासाछठी खर्चही खूप येईल.तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते. दुसऱ्याच्या पैशाने हे निर्णय घेणे खूप सोपे आहे. अशा परिस्थिती तुम्ही असे म्हणू शकत नाही की, 'मला काम द्या, तुम्ही मला किती पैसे द्याल, मी कामावर आल्यावर आणि काम कसे केले जाईल हे मी ठरवेन. त्यामुळे तुमच्यासोबत काम करण्याचे परिणाम त्यांना का भोगावे लागतील." असं स्पष्ट मत अभिनेत्याने व्यक्त केलं.