"मानेमध्ये गाठ अन्..." जॉनी लिव्हर यांचा लेक 'या' गंभीर आजाराने होता त्रस्त, अशी झालेली अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 19:52 IST2025-07-23T19:51:09+5:302025-07-23T19:52:34+5:30
जॉनी लिव्हर यांचा लेक 'या' गंभीर आजारने होता त्रस्त, अशी झालेली अवस्था, म्हणाले...

"मानेमध्ये गाठ अन्..." जॉनी लिव्हर यांचा लेक 'या' गंभीर आजाराने होता त्रस्त, अशी झालेली अवस्था
Johny Lever: वेगवेगळ्या हिंदी सिनेमांमध्ये आपल्या विनोदी शैलीच्या जोरावर चाहत्यांचं मनोरंजन करणारे अभिनेते म्हणजे जॉनी लिव्हर (Johny Lever). त्यांचे जगभरात चाहते आहेत. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी इंडस्ट्रीत हक्काचं स्थान निर्माण केलं. त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवत लेक जेमीने इंडस्ट्रीत एन्ट्री घेतली आहे. पण, एकेकाळी एका वाईट प्रसंगामुळे हा अभिनेता पुरता खचला होता. त्याचं कारण म्हणजे मुलाचं आजारपण ठरलं होतं. लहानपणी जॉनी लिव्हर यांच्या लेकाला गंभीर आजाराचं निदान झालं होतं. एका मुलाखतीत अभिनेत्याने त्याच्या आजारपणाबद्दल भाष्य केलं होतं.
जॉनी लिव्हर यांनी 'कुनिका सदानंद' यांच्या पॉडकास्टमध्ये मुलाच्या आजारपणाबद्दल पहिल्यांदाच सांगितलं होतं. त्यादरम्यान ते म्हणाले, 'माझ्या मुलाला मानेमध्ये गाठ आली होती. त्यासाठी त्याच्यावर अनेक उपचार करण्यात आले होते शिवाय शस्त्रक्रियासुद्धा करण्यात आली होती. पण, त्यानेही काहीच फरक नव्हता. डॉक्टर त्याच्या मानेमधून ट्यूमरची गाठ पूर्णपणे काढू शकत नव्हते. त्यावेळी डॉक्टरांनी ते माझ्या मुलावर उपचार करणार नाहीत, असं स्पष्ट सांगितलं. कारण, त्याच्यामुळे माझ्या मुलाची दृष्टी जाण्याची शक्यता होती. तसेच त्याला अर्धांगवायूचा धोका निर्माण होईल, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं.
पुढे त्यांनी सांगितलं की, "त्यावेळी मी माझ्या मुलाला रुग्णालयात असताना पाहिलं. शिवाय डॉक्टरांनी त्याची ट्यूमरची गाठ औषधांनी कमी व्हावी म्हणून गोळ्या दिल्या होत्या. तो दिवसाला अंदाजे ४०-५० गोळ्या खायचा. पण तरीसुद्धा त्याने काहीच फरक पडला नाही आणि ट्यूमरची गाठ दिवसेंदिवस वाढतच चालली होती. तेव्हा तो साधारण बारा वर्षांचा असावा. त्याच्या शाळेतही इतर मुलं त्याची मस्करी करायचे. त्यावेळी मला जमेल ते सगळं मी त्याच्यासाठी केलं. त्याला हवं ते सगळं देण्याचा प्रयत्न केला."
डॉक्टरांनी ट्यूमरची गाठ काढली अन्...
"आम्ही एकदा यूएस ट्रीपवर गेलो होतो. तेव्हा आम्ही एका चर्चमध्ये जायचं असं ठरवलं. तिथे प्रिस्ट होते आणि त्यांनी जस्सीला पाहिलं आणि त्याच्याबद्दल विचारलं. मग त्यांनी मला स्लोन केटरिंग रुग्णालयात त्याला घेऊन जाण्यास सांगितलं आणि देव त्याला बरा करेल, असं ते म्हणाले होते. भारतातील डॉक्टरांनी जे काही सांगितलं होतं ते ऐकून माझी पत्नी प्रचंड घाबरली होती. न्यू जर्सी रुग्णालयाध्ये काही चांगले डॉक्टर माझे मित्र होते. त्यांनी मला डॉक्टर जतीन शाह यांना भेटण्याचा सल्ला दिला. मी फार देव देव करत नव्हतो पण, तेव्हापासून माझ्या मुलासाठी त्या काळी देवाकडे मनापासून प्रार्थना केली. मग शस्त्रक्रिया झाली तेव्हा आम्ही सगळेच खूप काळजीत होतो, पण डॉक्टरांनी मला त्याची शस्त्रक्रिया नीट झाली असं सांगितलं. तसंच त्यांनी त्याची ट्यूमरची गाठ काढली होती." असा खुलासा त्यांनी मुलाखतीत केला.