'या' ब्लॉकबस्टर चित्रपटांची हृतिक रोशनला मिळालेली ऑफर, नकार दिल्याचा आजही होतोय पश्चाताप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 15:09 IST2025-08-07T15:00:49+5:302025-08-07T15:09:27+5:30
'दिल चाहता है', '३ इडियट्स' हृतिक रोशनने का नाकारला? अभिनेत्याने सांगतिलं कारण, म्हणाला...

'या' ब्लॉकबस्टर चित्रपटांची हृतिक रोशनला मिळालेली ऑफर, नकार दिल्याचा आजही होतोय पश्चाताप!
Hritik Roshan: बॉलिवूडमधील सध्याच्या काही आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे लोकप्रिय अभिनेता म्हणजे हृतिक रोशन. दमदार अभिनय आणि नृत्य कौशल्याच्या जोरावर त्याने चाहत्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. बॉलिवूडचा ग्रीक गॉड म्हणून ओळखला जाणारा हा अभिनेता वॉर-२ चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आहे. येत्या १४ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याचदरम्यान, एका मुलाखतीत, अभिनेत्याने 'दिल चाहता है' आणि '३ इडियट्स' चित्रपटांची ऑफर आली होती, पण त्याने ती नाकारली असा खुलासा केला. या निर्णयाचा आजही पश्चाताप होत असल्याची कबुली त्याने दिली.
दरम्यान, 'वॉर-२' च्या प्रमोशनसाठी संपूर्ण टीमने कंबर कसली आहे. श्रीलंकामध्ये एका प्रमोशन इव्हेंटदरम्यान, हृतिकने माध्यमांसोबत संवाद साधला. त्यावेळी अभिनेता म्हणाला, मी दिल चाहता है तसेच 3 इडियट्स सारखे सुपरहिट चित्रपट नकारले. मला असं वाटतं की, या दोन्ही चित्रपटांसाठी आमिर हा बेस्ट चॉईस होता. जे नशीबात असतं तेच घड़तं. आमिर खान एक उत्तम अभिनेता आहेत, त्यांनी चित्रपटातील भूमिकांना योग्य न्याय दिला. असं मत अभिनेत्याने मांडलं.
'वॉर-२' या चित्रपटात हृतिक रोशनसह ज्युनिअर एनटीआर यांच्यासह किआरा अडवाणीची देखील भूमिका आहे. हा चित्रपट असून हिंदी,तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. या बहुचर्चित चित्रपटात हृतिक आणि ज्यूनिअर एनटीआरला पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित वॉर २' हा YRF च्या स्पाय युनिव्हर्स मधील एक महत्त्वाचा सिनेमा आहे.