हृतिक रोशनची एक चूक अन् फरहान अख्तर, अभय देओल मरता मरता वाचले; असं काय घडलेलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 13:32 IST2024-12-06T13:28:44+5:302024-12-06T13:32:10+5:30
'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान हृतिक रोशनची एक चूक फरहान अख्तर आणि अभय देओलला महागात पडली असती. असं काय घडलेलं? जाणून घ्या.

हृतिक रोशनची एक चूक अन् फरहान अख्तर, अभय देओल मरता मरता वाचले; असं काय घडलेलं?
Zindagi Na Milegi Dobara: २००१ मध्ये प्रदर्शित झालेला जिंदगी ना मिलेगी दोबारा (Zindagi Na Milegi Dobara) हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंती उतरला होता. अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan), फरहान अख्तर (Farhaan Akhtar), अभय देओल (AbhayDeol) यांच्यासह कतरिना कैफ आणि कल्की कोचलिन अशी बॉलिवूड कलाकारांची फळी चित्रपटामध्ये पाहायला मिळाली. तीन मित्रांची बॅचलर पार्टी आणि त्यांची ट्रिपवरील धमाल असं या चित्रपटाचं कथानक आहे. त्यावेळी चित्रपटातील गाणी, तसेच कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडला. या सिनेमामध्ये एकापेक्षा एक मजेदार सीन्स होते. पण, 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' च्या शूटिंगदरम्यान हृतिक रोशनची एक चूक अभय देओलला महागात पडली असती. या सिनेमाचा एक सीन शूट करताना अभय व फरहान अगदी मरता मरता वाचले होते. याचा थरारक अनुभव अभिनेता अभय देओलनेही एका मुलाखतीत सांगितला होता.
दरम्यान, 'जिंदगी ना मिलेगी दोबारा’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडीओत चित्रपटातील काही सीन्स दाखवण्यात आले आहेत. या सीनमध्ये हृतिक, फरहान आणि अभय बार्सिलोना ते कोस्टा ब्रावा प्रवास करत असतात. त्यावेळी हृतिक गाडी चालवत असतो. दरम्यान हृतिक रोशनला तेव्हा ऑफिसमधून एक फोन येतो. फोनवर बोलण्यासाठी तो गाडी घाटात रस्त्याच्या बाजूला लावतो आणि गाडीतून खाली उतरतो. पण हृतिक गाडीतून उतरताना गाडीचा हँड ब्रेक लावायला विसरतो. हृतिक खाली उतरताच गाडी पुढे सरकते. फरहान गाडीतून उडी मारतो आणि गाडीत बसलेला अभय घाबरतो. पण हृतिक रोशन पटकन येऊन गाडी बंद करतो. असं या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसतंय.
या सीनबद्दल अभय देओलने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत सांगितलं होतं की, "हा सीन शूट करण्यापूर्वी हृतिकने मी आणि फरहानला मरता मरता वाचलो होतो. फरहान हा माझ्यापेक्षा खूपच फास्ट होता. त्याने या सीनवेळी लगेच गाडीतून उडी मारली पण मी गाडीतच बसून राहिलो. तेव्हा मला वाटलं की मी आता मरणार आहे." असा खुलासा अभिनेत्याने केला होता.