लग्नाच्या ८ वर्षांतच संसार मोडला अन्...; घटस्फोटानंतर एक्स पत्नीलाच डेट करतोय 'हा' अभिनेता, लव्ह लाईफ चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 10:51 IST2025-09-03T10:47:22+5:302025-09-03T10:51:10+5:30

लग्नाच्या ८ वर्षांतच संसार मोडला अन् आता घटस्फोटानंतर एक्स बायकोलाच करतोय डेट; कोण आहे हा अभिनेता?

bollywood actor gulshan devaiah dating his ex wife kallirroi tziafeta after divorce know about his love life | लग्नाच्या ८ वर्षांतच संसार मोडला अन्...; घटस्फोटानंतर एक्स पत्नीलाच डेट करतोय 'हा' अभिनेता, लव्ह लाईफ चर्चेत

लग्नाच्या ८ वर्षांतच संसार मोडला अन्...; घटस्फोटानंतर एक्स पत्नीलाच डेट करतोय 'हा' अभिनेता, लव्ह लाईफ चर्चेत

Bollywood Actor Love Life: आपले आवडते  सेलिब्रिटी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ते काय करतात, कसे वागतात याबद्दल जाणून घेण्यास चाहते प्रचंड उत्सुक असतात. त्यात कलाकारांचं रिलेशनशिप, लग्न मोडणं किंवा घटस्फोट या गोष्टी काही नवीन नाहीत. अशी कित्येक उदाहरणे आहेत. परंतु, सध्या बॉलिवूडचा एक अभिनेता त्याच्या एका निर्णयामुळे चर्चेचा विषय ठरला आहे. लग्नाच्या ८ वर्षानंतर घटस्फोट घेतल्यानंतर हा अभिनेता आता त्याच्या पत्नीलाच डेट करत असल्याची कबुली त्याने दिली आहे. हा अभिनेता म्हणजे गुलशन देवैय्या.

अभिनेता गुशन देवैय्याने  साल २०१२ मध्ये युरोपियन नागरिक असलेली कल्लिरोई तजियाफेटासोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर काही काळानंतर त्यांनी आपल्या नात्याला पूर्णविराम देत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतरही गुलशन पूर्वाश्रमीची पत्नीसोबत संपर्कात होता. कालांतराने त्याला आपण घेतलेल्या निर्णयाचा पश्चाताप होऊ लागला. आपल्या नात्याला दुसरी संधी देत अभिनेत्याने पुढचा विचार केला. लग्नानंतर ८ वर्ष एकत्र राहिल्यानंतर घटस्फोट आणि त्यानंतर ३ वर्ष कल्लिरोईला आपण डेट केल्याची कबुली अभिनेत्याने अलिकडेच एका मुलाखतीमध्ये दिली.

अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये गुलशन म्हणाला  होता की,"ती भारतात फिरायला आली होती. त्यादरम्यान आम्ही भेटलो आणि प्रेमात पडलो. त्यावेळी ती युकेमध्ये राहत होती. ती ग्रीक नागरिक आहे. आम्हाला एकमेकांशी लग्न करायचं होतं, त्यामुळे आम्ही लग्न केलं." असं गुलशनने एका मुलाखतीमध्ये सांगितलं.

पुढे अभिनेता म्हणाला, "खूप काही गोष्टी घडत होत्या मला  काहीच समजत नव्हतं. माझ्या एक्स पत्नीसाठी तिचं करिअर देखील तितकंच महत्वाचं होतं. मी सुद्धा माझ्या करिअरकडे लक्ष देत असताना, नकळतपणे घराकडे दूर्लक्ष होऊ लागलं. या गोष्टींमुळे आमच्यात वाद वाढू लागले. त्यामुळे आमच्यात प्रेमाचीही कमी भासत होती. वैवाहिक जीवनाचा आनंदच घेता येत नव्हता, घटस्फोटानंतर काही काळ आम्ही एकमेकांशी कोणताच संपर्क ठेवला नाही.त्यानंतर हळूहळू आमच्यात बोलणं सुरु झालं आणि आम्ही पुन्हा एकत्र आलो." असं अभिनेत्याने सांगितलं होतं.

वर्कफ्रंट

अभिनेता गुलश देवैय्याच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याने 'गोलियों की रासलीला राम-लीला', 'गर्जना', 'शैतान', 'बधाई दो','घोस्ट स्टोरीज', 'मर्द को दर्द नहीं होता' अशा चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 

Web Title: bollywood actor gulshan devaiah dating his ex wife kallirroi tziafeta after divorce know about his love life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.