वाढदिवशी इमरान हाश्मीचं चाहत्यांना खास सरप्राइज; १८ वर्षांनंतर 'या' गाजलेल्या सिनेमाच्या सीक्वलची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 15:49 IST2025-03-24T15:45:52+5:302025-03-24T15:49:18+5:30
बॉलिवूडचा सिरियल किसर अशी ओळख मिळवलेला अभिनेता इमरान हाश्मी नेहमीच चर्चेत असतो.

वाढदिवशी इमरान हाश्मीचं चाहत्यांना खास सरप्राइज; १८ वर्षांनंतर 'या' गाजलेल्या सिनेमाच्या सीक्वलची घोषणा
Emraan Hashmi: बॉलिवूडचा सिरियल किसर अशी ओळख मिळवलेला अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) नेहमीच चर्चेत असतो. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम करून इमरानने बॉलिवूडमध्ये त्याचं बस्तान बसवलं. कधी अॅक्शन करताना तर कधी रोमँटिक भूमिकेत तो दिसला. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर इमरानने बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं आहे. 'मर्डर', 'आशिक बनाया आपने' हे त्याचे चित्रपट प्रचंड गाजले. जगभरात इमरानचे करोडो चाहते आहेत. अलिकडेच इमरान हाश्मी टायगर-३ चित्रपटामुळे चर्चेत आला होता. आज २४ मार्चला अभिनेत्याचा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून अभिनेत्याने केलेल्या घोषणेने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
लवकरच इमरान हाश्मीच्या १८ वर्ष जुन्या चित्रपटाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो चित्रपट म्हणजे आवारापन आहे. नुकतीच इमरान हाश्मीने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना माहिती दिली आहे. "बस मुझे कुछ दिन और जिंदा रख..., 'आवारापन-२' लवकरच तुमच्या भेटीला येत आहे."अशा आशयाची पोस्ट अभिनेत्याने शेअर केली आहे. ३ एप्रिल २०२६ हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित करण्यात येणार आहे.
'आवारापन' हा चित्रपट २००७ मध्ये प्रदर्शित झाला होता. परंतु बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला फारसं यश मिळालं नाही. मोहित सूरी दिग्दर्शित या सिनेमात साउथ अभिनेत्री श्रिया सरण इमरान हाश्मीसोबत मुख्य भूमिकेत होती.