"तरच तू पुढे जाशील…",'धुरंधर' फेम रणवीर सिंगकडे कास्टिंग एजंटने केलेली धक्कादायक मागणी, प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 18:13 IST2026-03-27T17:56:25+5:302026-03-27T18:13:44+5:30
"मला फक्त...", करिअरच्या सुरुवातीला रणवीर सिंगकडे कास्टिंग एजंटने केलेली घाणेरडी मागणी,अभिनेत्याने दिलेलं 'असं' उत्तर

"तरच तू पुढे जाशील…",'धुरंधर' फेम रणवीर सिंगकडे कास्टिंग एजंटने केलेली धक्कादायक मागणी, प्रकरण काय?
Ranveer Singh : अभिनयाचं चंदेरी जग लांबून जितकं आकर्षक दिसतं, प्रत्यक्षात पडद्यामागचं वास्तव भीषण असतं. मनोरंजनविश्वात काम करणाऱ्या कलाकारांना करिअरच्या सुरुवातीच्या काळामध्ये अशा अनेक चांगल्या-वाईट प्रसंगांना सामोरं जावं लागतं. बॉलिवूडचा धुरंधर अभिनेता रणवीर सिंग देखील याचा सामाना करावा लागला. एका मुलाखतीत रणवीरने त्याला इंडस्ट्रीत आलेल्या कास्टिंग काऊचच्या अनुभवावर भाष्य केलं होतं.
'गुंडे', 'दिल धडकने दो', 'बाजीराव मस्तानी', 'बेफिक्रे', 'पद्मावत', 'सिम्बा', 'गली बॉय' आणि '83' यांसारखे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या रणवीर सिंगच्या यशामागे मोठा संघर्ष दडलेला आहे. 'NDTV' ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये रणवीरने खुलासा केला होता की त्याला एका कास्टिंग एजंटकडून वाईट अनुभव आला होता. जेव्हा रणवीरने त्याचा पोर्टफोलिओ एजंटकडे दिले, तेव्हा त्याने त्याकडे पाहिलेही नाही. तो म्हणाला, "तू हुशार आणि स्मार्ट आहेस. असे लोक लवकर पुढे जातात.तरच तू देखील पुढे जाशील.मग त्याने, फक्त तुला स्पर्श करू दे अशी मागणी केली." रणवीरने तीव्र विरोध केला. तो म्हणाला की, तो अनुभव धक्कादायक होता.पण मी त्याला स्पष्ट शब्दांत नकार दिला होता.
रणवीर म्हणाला की, त्यावेळी त्याला पूर्णपणे धक्का बसला होता. काय घडत आहे हे त्याला समजत नव्हतं.त्यानंतर त्याने सांगितलं की, त्याला नंतर कळले की त्याच एजंटने दुसऱ्या एका अभिनेत्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. तो म्हणाला, ही एक अगदी खरी गोष्ट आहे. मी देखील या सगळ्यातून गेलो आहे. असा खुलासा रणवीरने केला होता.
रणवीर सिंग गेली १६ वर्ष इंडस्ट्रीत सक्रिय आहे.सध्या तो'धुरंधर २' या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १ हजार कोटींहून अधिक कमाई केली आहे.