किती गोड! 'छावा' फेम अभिनेत्याने पहिल्यांदाच दाखवली लेकाची झलक, शेअर केला कुटुंबाचा सुंदर व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 16:09 IST2025-09-25T16:05:22+5:302025-09-25T16:09:29+5:30
VIDEO: 'छावा' फेम अभिनेत्याने पहिल्यांदाच दाखवली लेकाची झलक, शेअर केला कुटुंबाचा सुंदर व्हिडीओ

किती गोड! 'छावा' फेम अभिनेत्याने पहिल्यांदाच दाखवली लेकाची झलक, शेअर केला कुटुंबाचा सुंदर व्हिडीओ
Vineet Kumar Singh Video: आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांची पसंती मिळवणारा अभिनेता म्हणजे विनीत कुमार सिंह. विकी कौशलच्या छावा सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांचा मित्र कवी कलश यांची भूमिका साकारुन या अभिनेत्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. छावा चित्रपटातील आपल्या अभिनयाने त्याने सिनेरसिकांच्या मनावर एक वेगळी छाप उमटवली. अलिकडेच या अभिनेत्याने चाहत्यांना गुडन्यूज दिली होती. लग्नाच्या चार वर्षानंतर विनीत कुमारच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं. सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत त्याने चाहत्यांना ही बातमी दिली होती. अशातच आता लेकाच्या जन्माच्या २ महिन्यानंतर विनीत कुमार सिंगने पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
लेकाच्या जन्मानंतर त्याच्या आयुष्यातील नव्या अध्यायाला सुरुवात झाली आहे. नुकताच अभिनेत्याने सोशल मीडियावर त्याच्या त्रिकोणी कुटुंबाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये विनित आणि त्याची पत्नी लेकासोबत खेळताना दिसत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर हा सुंदर व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी आपला मुलगा २ महिन्यांचा झाला असल्याची माहितीही दिली आहे. सोशल मीडियावर विनित सिंहचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर कलाकारांसह त्याचे चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
दरम्यान, विनीत आणि त्याची पत्नी रुचिराबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी जवळपास आठ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०१ मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नाच्या ४ वर्षांनी विनीत आणि रुचिरा आईबाबा झाल्याने दोघेही आनंदी आहेत. त्यांच्या आयुष्यातील नव्या पर्वाला आता सुरुवात झाली आहे.