ख्रिसमसच्या निमित्ताने वरुण धवनने पहिल्यांदाच दाखवली लेकीची झलक; चाहत्यांना अनोखं सरप्राईज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 10:14 IST2024-12-26T10:12:00+5:302024-12-26T10:14:20+5:30

डिसेंबर महिना एकदा सुरू झाला की सर्वांना ख्रिसमसची ओढ लागून राहते.

bollywood actor baby john fame varun dhawan christmas celebration with wife natasha shares first picture of her daughter lara on social media | ख्रिसमसच्या निमित्ताने वरुण धवनने पहिल्यांदाच दाखवली लेकीची झलक; चाहत्यांना अनोखं सरप्राईज

ख्रिसमसच्या निमित्ताने वरुण धवनने पहिल्यांदाच दाखवली लेकीची झलक; चाहत्यांना अनोखं सरप्राईज

Varun Dhawan Christmas Celebration: डिसेंबर महिना एकदा सुरू झाला की सर्वांना ख्रिसमसची ओढ लागून राहते. जगभरात काल सर्वत्र ख्रिसमसचा उत्साह पाहायला मिळाला. सर्वसामान्यांप्रमाणे कलाविश्वातील तारे-तारकाही ख्रिसमससाठी जोरदार तयारी करत असतात. दरम्यान, सगळीकडे ख्रिसमचा उत्साह असताना अभिनेता वरुण धवननेही (Varun Dhawan)​​​ यंदाचा त्याचा ख्रिसमस अगदी छान पद्धतीने सेलिब्रेट केला आहे. याच कारणही तितकच खास आहे. वरुणने यंदाचा ख्रिसमस त्याच्या लाडक्या लेकीसोबत साजरा केला. शिवाय या निमित्ताने अभिनेत्याने त्याची लेक लाराची पहिल्यांदाच झलक दाखवली आहे. 


वरुण धवनची पत्नी नताशा दलाल हिने ३ जून २०२४ रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला. आता अभिनेत्याची लेक ६ महिन्यांची झाली आहे. वरुण धवनने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर लाडक्या लेकीचा एक फोटो शेअर करत तिची झलक चाहत्यांना दाखविली आहे. फोटोमध्ये त्याची पत्नी नताशाकडे मुलगी दिसते आहे तर वरुणच्या जवळ त्याचा पाळीव श्वान दिसतोय. दरम्यान, अभिनेत्याने सोशल मीडियावर बेबी लाराचा फोटो पोस्ट करताना तिच्या चेहऱ्यावर हार्ट इमोजी लावला आहे. "मी अ‍ॅंड माय बेबीज! मेरी ख्रिसमस..." असं कॅप्शन या फोटोंना देत अभिनेत्याने सोशल मीडियावर त्यांचा खास फॅमिली फोटो शेअर केला आहे.

बॉलिवूड अभिनेता  वरुण धवनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर सध्या मनोरंजनविश्वात त्याचा नावाची चर्चा होताना दिसते. वरुण धवन मुख्य भूमिकेत असलेला 'बेबी जॉन' हा त्याचा बहुचर्चित सिनेमा अखेर सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये वरुण धवनसोबत साउथ क्वीन किर्ती सुरेशसह वामिका गब्बी महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. ख्रिसमच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज करण्यात आला आहे. 

Web Title: bollywood actor baby john fame varun dhawan christmas celebration with wife natasha shares first picture of her daughter lara on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.