अर्जुन कपूरच्या 'मेरे हसबंड की बिवी'मधील 'त्या' सीनवर आक्षेप, सेन्सॉर बोर्डाची कात्री लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 10:02 IST2025-02-21T09:58:36+5:302025-02-21T10:02:06+5:30

अर्जुन कपूरच्या 'मेरे हसबंड की बिवी' मधील 'या' दृश्यांना लागणार कात्री; 'ते' सीन्स काढण्याची मागणी 

bollywood actor arjun kapoor mere husband ki biwi movie object by sensor board demand to cut scene know the reason | अर्जुन कपूरच्या 'मेरे हसबंड की बिवी'मधील 'त्या' सीनवर आक्षेप, सेन्सॉर बोर्डाची कात्री लागणार

अर्जुन कपूरच्या 'मेरे हसबंड की बिवी'मधील 'त्या' सीनवर आक्षेप, सेन्सॉर बोर्डाची कात्री लागणार

Mere Husband Ki Biwi : अर्जुन कपूर(Arjun Kapoor), भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar)आणि रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) स्टारर 'मेरे हसबंड की बिवी' हा सिनेमा आज जगभरात प्रदर्शित झाला आहे. या रोमकॉम चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा होताना दिसते. गेल्या काही दिवसांपासून या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात चांगलीच उत्सुकता निर्माण केली आहे. परंतु या चित्रपटाबाबती मोठी अपडेट समोर आली आहे. आता या चित्रपटातील काही दृश्यांना सेन्सॉर बोर्डाने कात्री लावली आहे.

दरम्यान 'मेरे हसबंड की बिवी' चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने UA प्रमाणपत्र दिले आहे. पण याबरोबरच या चित्रपटातील काही आक्षेपार्ह सीन्स कट करण्यात आले आहेत. 'मेरे हसबंड की बिवी’ वादग्रस्त ठरू शकतील अशा चार सीन्सना सेन्सॉर बोर्डाने कात्री लावली आहे, अशी माहिती समोर येत आहे. त्याचा परिणाम चित्रपटाच्या रनटाईमवर होण्याची शक्यता आहे. चित्रपटातील आक्षेपार्ह एक्सप्रेशन्स आणि डायलॉग्ज सुद्धा बदलण्याचा सल्ला दिला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटात 'मोदी जी' या शब्दाच्या जागी 'द गव्हर्नमेंट' हा शब्द वापरावा आदेश दिले आहेत. तसेच 'हरयानवी' शब्दात सुद्धा बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे 'मेरे हसबंड की बिवी' चित्रपटाचा रनटाईम आता २ तास २३ मिनिटे आणि ४४ सेकंद इतका असेल.

'मेरे हसबंड की बीवी' या चित्रपटाची निर्मिती पूजा फिल्म्सने केली आहे. तर मुदस्सर अजीझ यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. 'लव्ह ट्रँगल नही फूल सर्कल है' अशी या सिनेमाची टॅगलाइन आहे. 

Web Title: bollywood actor arjun kapoor mere husband ki biwi movie object by sensor board demand to cut scene know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.