"मी अयशस्वी व्हावं असंच लोकांना वाटतं...", ट्रोलिंगवर अर्जुन कपूरचं थेट भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 13:50 IST2024-12-21T13:43:13+5:302024-12-21T13:50:54+5:30
अर्जुन कपूर (Arjun Kapoor) हा बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. '

"मी अयशस्वी व्हावं असंच लोकांना वाटतं...", ट्रोलिंगवर अर्जुन कपूरचं थेट भाष्य
Arjun Kapoor: अर्जुन कपूर (Arjun Kapoor) हा बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. 'इश्कजादे' या चित्रपटातून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर अर्जुन कपूर बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्ये तो झळकला. मात्र, त्याला फारसं यश मिळालं नाही. अभिनेता अर्जुन कपूर त्याच्या अभिनयासह वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. अलिकडेच तो रोहित शेट्टी (Rohit Shetty) दिग्दर्शित 'सिंघम अगेन' चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आला होता. या सिनेमात अभिनेता अर्जुन कपूर निगेटिव्ह भूमिकेत पाहायला मिळत आहे. दरम्यान 'सिंघम अगेन'मधील डेंजर लंका या त्याच्या व्यक्तिरेखेची प्रेक्षकांकडून प्रशंसा होत आहे. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने सोशल मीडियावर ट्रोलिंगवर भाष्य केलं आहे.
नुकतीच अर्जुन कपूरने राज शमानी यांच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. या मुलाखतीमध्ये अभिनेत्याने ट्रोलिंवर खुलेपणाने भाष्य केलं आहे. त्यादरम्यान अभिनेता म्हणाला, "लोकांना वाटतं की मी अपयशी व्हावं. बऱ्याचदा माझ्या अडनावावरून ट्रोल केलं जातं. त्याचबरोबर माझं वैयक्तिक आयुष्य आणि चित्रपटांबद्दलही लोकं खूप काही बोलत असतात. "
पुढे अभिनेता म्हणाला, "लोकांना असं वाटतं की याला कामाची काहीच पडलेली नसते. शिवाय काहीजण तर असंही म्हणतात की मी अभिनेता बनण्याच्या पात्रतेचा नाही. खंर सांगायचं झालं तर, जेव्हा मी करिअरच्या महत्वाच्या टप्प्यात होतो जेव्हा मी असंख्य अडचणींचा सामना करत होतो त्यावेळी सुद्धा मला अशा गोष्टी ऐकाव्या लागल्या होत्या. या चुकीच्या नरेटिव्हमुळे लोकं माझ्याबद्दल आणखी बोलू लागलेत."