VIDEO: कलाकाराला आणखी काय हवं असतं! 'KBC'च्या मंचावर 'बिग बी' म्हणाले असं काही...; अनन्या पांडेच्या डोळ्यांत तरळले अश्रू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 11:17 IST2025-12-24T11:13:38+5:302025-12-24T11:17:07+5:30
"इतक्या अनुभवी कलाकारांसोबत…", अनन्या पांडेचं बिग बींनी केलं भरभरून कौतुक, भावुक झाली अभिनेत्री; म्हणाली...

VIDEO: कलाकाराला आणखी काय हवं असतं! 'KBC'च्या मंचावर 'बिग बी' म्हणाले असं काही...; अनन्या पांडेच्या डोळ्यांत तरळले अश्रू
Ananya Pandey Share Video:बॉलिवूड महानायक म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन यांनी आजपर्यंतच्या सिनेकारकीर्दीत अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे.वयाच्या ८३ वर्षी देखील बिग बी तितक्याच उत्सुकतेने आणि आनंदाने काम करताना दिसतात. बॉलीवूडमधील एखादा लोकप्रिय नट किंवा अगदी नवोदित कलाकार, अशा प्रत्येकाचीच अमिताभ यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा असते. आजवर अनेक कलाकारांनी त्यांच्याबरोबर काम केलंही आहे. त्यात बिग बींकडून आपल्या कामाचं कौतुक होणं, ही कोणत्याही कलाकारासाठी मोठी गोष्ट आहे. असाच काहीसा प्रकार अभिनेत्री अनन्या पांडेसोबत घडला.
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे पुन्हा एकदा 'तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी' या चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या दोघांनीही कौन बनेगा करोडपती या शोमध्ये हजेरी लावली होती. दरम्यान, अनन्या पांडेने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर केबीसीच्या शोमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. कार्यक्रमादरम्यान, अमिताभ बच्चन अनन्याबद्दल असं काही बोलले जे ऐकून अनन्या पांडे भावूक झाली.या शोदरम्यान, अमिताभ बच्चन यांनी अनन्याच्या 'केसरी चॅप्टर २' या चित्रपटातील कामाचं खूप कौतुक केलं, ज्यामुळे अनन्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. हा व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर अकाउंटवर पोस्ट अनन्याने बिग बींचे आभार मानले आहेत. या व्हिडीओला कॅप्शन देत अनन्याने म्हटलंय,"कोणत्याही कलाकाराच्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण.अमितजी, मी तुमचे शब्द कायम लक्षात ठेवेन. " अशा भावना अभिनेत्रीने याद्वारे व्यक्त केल्या आहेत.
'बिग बी' काय म्हणाले?
या व्हिडिओमध्ये बिग बी केबीसीच्या मंचावर म्हणतात," यांचा 'केसरी चॅप्टर -२' नावाचा चित्रपट आहे. त्यात अनेक मोठे कलाकार होते आणि सर्वांनीच अप्रतिम काम केलं आहे.पण इतक्या अनुभवी कलाकारांसोबत अनन्याने आपली भूमिका उत्तम प्रकारे साकारली."
बिग बी पुढे म्हणाले,"अनन्याला जास्त बोलावे लागले नाही. पण तिने आपल्या डोळ्यांतून आणि हावभावांतून उत्तम प्रकारे व्यक्त केलं.आम्ही सर्व एकाच प्रोफेशनमध्ये आहोत आणि आमच्या भूमिका व संवाद काय आहेत हे आम्हाला तीन महिने आधीच कळते.पण जेव्हा शूटिंग पूर्ण होतं तेव्हा प्रेक्षकांना असं वाटलं पाहिजं की आम्ही सुद्धा हे
पहिल्यांदाच करत आहोत, बोलत आहोत. तिथेच कलाकाराची प्रतिभा दिसून येते."बिग बींनी आपल्या कामाचं कौतुक केलेलं ऐकताच अभिनेत्रीला अश्रू अनावर झाले.