काय सांगता! अमिताभ बच्चन यांनी केलंय 'या' मराठी चित्रपटात काम; पत्नी जया देखील होत्या सोबतीला, तुम्ही पाहिला का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 15:56 IST2025-10-17T15:45:38+5:302025-10-17T15:56:06+5:30
अमिताभ बच्चन यांनी केलंय 'या' मराठी चित्रपटात काम; पत्नी जया देखील आहेत सोबतीला, तुम्ही पाहिला का?

काय सांगता! अमिताभ बच्चन यांनी केलंय 'या' मराठी चित्रपटात काम; पत्नी जया देखील होत्या सोबतीला, तुम्ही पाहिला का?
Amitabh Bachchan Marathi Movie: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आजही त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असा आहे. बिग बींनी जवळपास सहा दशकं काम केलं आहे. हिंदी चित्रपटातील त्यांची प्रत्येक भूमिका गाजली.अमिताभ बच्चन यांचं हिंदी चित्रटसृष्टीच्या इतिहासात वेगळं स्थान आहे. पडद्यावर प्रत्येक व्यक्तिरेखा अत्यंत प्रभावीपणे आणि सूक्ष्म बारकाव्यांसह त्यांनी सादर केली. परंतु, तुम्हाला माहितीये का बॉलिवूड गाजवणाऱ्या या महानायकाने एका मराठी चित्रपटातही काम केलं आहे.
त्याकाळी एखादा हिंदी कलाकार मराठी चित्रपटात दिसणं हा खरंतर तेव्हाही कुतुहलाचा विषय असायचा.राजेश खन्ना,अमिताभ बच्चन, अनिल कपूर तसंच सलमान खान या कलाकारांनीही मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अमिताभ बच्चन यांनी १९९४ मध्ये आक्का या मराठी चित्रपटात कॅमिओ केला होता. या चित्रपटात त्यांच्या पत्नी जया बच्चन देखील पाहायला मिळाल्या.विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे मेकअपमॅन दीपक सावंत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. तर श्रीधर जोशी यांचं दिग्दर्शन आहे.
दरम्यान, अक्का चित्रपटातील तू जगती अधिपती नमन तुला पाहिले श्री गणपती असं गाणं होतं. मुंबईतील दादासाहेब फाळके चित्रनगरीतील देवळात या चित्रपटाचं शूटिंग करण्यात आलं. आक्का चित्रपटाच्या निमित्ताने अमिताभ बच्चन पहिल्यांदाच मराठीत बोलले आहेत.अभिनेते अजय फणसेकर, सुलभा देशपांडे तसेच प्रशांत दामले अशा तगड्या कलाकारांची फौज या चित्रपटात होती. हा चित्रपट युट्यूबवर उपलब्ध आहे.