अक्षय कुमारच्या बहुचर्चित 'ओह माय गॉड' सिनेमाचा तिसरा भाग येणार? प्रेक्षकांची उत्सुकता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 13:36 IST2025-05-20T13:32:36+5:302025-05-20T13:36:24+5:30

'ओह माय गॉड' सिनेमाचा तिसरा भाग येणार? प्रेक्षकांची उत्सुकता वाढली

bollywood actor akshay kumar upcoming movie omg 3 confirm actor begin to shoot 2026 says report  | अक्षय कुमारच्या बहुचर्चित 'ओह माय गॉड' सिनेमाचा तिसरा भाग येणार? प्रेक्षकांची उत्सुकता वाढली

अक्षय कुमारच्या बहुचर्चित 'ओह माय गॉड' सिनेमाचा तिसरा भाग येणार? प्रेक्षकांची उत्सुकता वाढली

Akshay Kumar: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची (Akshay Kumar) सध्या हिंदी सिनेसृष्टीत जोरदार चर्चा आहे. २०२५ या वर्षात अभिनेता नवनवीन चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अलिकडेच अभिनेत्याची प्रमुख भूमिका असलेला 'केसरी-२' या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. यानंतर एकामागोमाग त्याचे चित्रपट प्रदर्शनास सज्ज झाले आहेत. त्यात आता अक्षय कुमारचा २०१२ साली प्रदर्शित झालेला 'ओह माय गॉड' चित्रपटाचा तिसरा भाग येणार असल्याची अपटेड समोर येत आहे. 'ओएमजी- ३' च्या पटकथेबाबत चित्रपट निर्माते अमित राय आणि अक्षय कुमार यांच्यात चर्चा झाली आहे. अशी माहिती मिळते आहे.

दरम्यान, २०१२ मध्ये 'ओह माय गॉड' फ्रँचायझी लाँच झाली. पहिल्या भागात अक्षय कुमारने भगवान श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती, तर २०२२ मध्ये 'ओएमजी २' मध्ये तो भगवान शिवशंकराच्या अवतारात दिसला होता. दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले आणि आता त्याच्या तिसऱ्या भागावरही काम सुरू झाले आहे.

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, निर्माते अमित राय आणि अक्षय कुमार यांच्यामध्ये ओएमजी-३ बद्दल चर्चा सुरु असल्याचं म्हटलं जात आहे. नुकतंच अक्षय कुमारने भूत बंगला चित्रपटाचं शूट पूर्ण केलं आहे. त्यामुळे लवकरच तो ओएमजी-३ च्या शूटिंगला सरुवात करु शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. येत्या २०२६ पर्यंत हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. परंतु स्क्रीप्ट पूर्ण झाल्यानंतर या चित्रपटाची स्टारकास्ट ही फानयल करण्यात येईल, असंही सांगण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत चित्रपटांच्या निर्मात्यांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे 

दरम्यान, अक्षय कुमारच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर अभिनेता सध्या त्याच्या आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. लवकरच त्याचा हाऊलफुल-५ हा चित्रपट रिलीज होणार आहे. त्यासोबत 'भूत बंगला', 'वेलकम टू द जंगल', 'हेरा फेरी-३' तसेच 'जॉली एलएलबी-३' या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: bollywood actor akshay kumar upcoming movie omg 3 confirm actor begin to shoot 2026 says report 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.