'रेड-२' ची ग्रॅंड ओपनिंग; अजय देवगण- रितेश देशमुखच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी कमावले 'इतके' कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 10:15 IST2025-05-02T10:12:07+5:302025-05-02T10:15:06+5:30
अजय देवगण- रितेश देशमुखच्या 'रेड-२' ची दमदार कामगिरी; पहिल्याच दिवशी कमावले 'इतके' कोटी

'रेड-२' ची ग्रॅंड ओपनिंग; अजय देवगण- रितेश देशमुखच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी कमावले 'इतके' कोटी
Raid 2 Box Office Collection Day 1: अजय देवगण (Ajay Devgan), रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि वाणी कपूर स्टारर 'रेड-२' हा चित्रपट काल १ मे रोजी देशभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. पहिल्यांदा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांना याबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. त्यामुळे प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपट किती कमाई करेल याकडे सगळ्यांच लक्ष लागून राहिलेलं होतं. त्यात आता 'रेड-२' चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचं कलेक्शन समोर आलं आहे.
'रेड-२' हा बहुचर्चित २०१८ मध्ये आलेल्या 'रेड' चा सीक्वल आहे. अजय देवगण 'रेड-२' मध्ये अमेय पटनायक या ऑफिसरच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. तर रितेश देशमुखने खलनायकाचं पात्र साकारलं आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, पहिल्याच दिवशी रेड- २ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवसाने बॉक्स ऑफिसवर १८.२५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. परंतु ही प्राथमिक आकडेवारी आहे. यामध्ये थोडाफार बदल बोऊ शकतो. रिलीजच्या पहिल्याच दिवशी रेड-२ सह संजय दत्तचा द भूतनी तसेच साउथचा रेट्रो या चित्रपटांमध्ये कॉंटे की टक्कर पाहायला मिळाली.
त्याचबरोबर हा चित्रपट वर्षातील सर्वाधिक ओपनिंग करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवलं आहे.
दरम्यान, 'रेड २' ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दबदबा निर्माण केला आहे. तसेच चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये सुमारे १० कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. रजत गुप्ता दिग्दर्शित सिनेमात अजय देवगण, रितेश देशमुख, सौरभ शुक्ला या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे.