'धुरंधर'मुळे अजय देवगणच्या 'धमाल ४' च्या तारखेत बदल? आता कधी होणार प्रदर्शित, जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 10:58 IST2025-12-10T10:55:50+5:302025-12-10T10:58:31+5:30
अजय देवगणच्या 'धमाल-४' बाबत मोठी अपडेट! 'धुरंधर' सोबत स्पर्धा टाळण्यासाठी प्रदर्शनाच्या तारखेत बदल?

'धुरंधर'मुळे अजय देवगणच्या 'धमाल ४' च्या तारखेत बदल? आता कधी होणार प्रदर्शित, जाणून घ्या
Dhamaal 4 Update: बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने त्याच्या अभिनयाच्या जोरावर फक्त भारतातच नव्हे तर जगभरात नाव कमावलं. अभिनयाबरोबरच निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून देखील त्याने काम केलं. अजय हा कायम त्याच्या विविध धाटणीच्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. रोमॅन्टिक ,क्राइम थ्रिलर असो किंवा विनोदी भूमिका त्याने प्रत्येक भूमिका लिलिया पेलली आहे. त्याचा प्रत्येक सिनेमा हा प्रेक्षकांसाठी एक मनोरंजनाची मेजवाणी असते. लवकरच तो धमाल-४ या चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. मात्र, या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबतीत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
'धमाल' या कॉमेडी फ्रॅंचायजीचा चाहतावर्ग कमालीचा मोठा आहे. अशातच लवकरच नावाजलेल्या कलाकारांची फौज घेऊन प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी धमाल-४ चित्रपट सज्ज आहे. अजय देवगणचा एक बहुप्रतिक्षित चित्रपट १९ मार्च २०२६ ला प्रदर्शित होणार होता. मात्र, आता या आगामी चित्रपटाची प्रदर्शन तारीख बदलण्यात आल्याचं वृत्त समोर येत आहे.
अलिकडेच अभिनेता रणवीर सिंगची प्रमुख भूमिका असलेला धुरंधर चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांची वाहवाह मिळताना दिसते आहे. एकीकडे पहिल्या भागाला प्रचंड प्रतिसाद मिळत असताना दुसऱ्या भागाचीही घोषणा करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, धुरंधरचा दुसरा भाग १९ मार्च २०२६ रिलीज करण्यात येईल असं जाहीर करण्यात आलं आहे. याच तारखेला, साऊथ सुपरस्टार यशचा टॉक्सिक आणि अजय देवगणचा धमाल ४ हे चित्रपट प्रदर्शित होणार होते. याचा फटका हा चित्रपटाच्या व्यवसायावर बसू शकतो. त्यामुळे निर्मात्यांनी 'धमाल-४' चं प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा चित्रपट मे २०२६ पर्यंत प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.
'धमाल' फ्रँचायझीचे मागील तिन्ही भाग व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झाले आहेत. धमाल ४ कडून चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. या चित्रपटात अर्शद वारसी, जावेद जाफरी, संजीदा शेख, संजय मिश्रा आणि रितेश देशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'धमाल ४' चं दिग्दर्शन इंदर कुमार यांनी केलं आहे.