जुनैद खान अन् खुशी कपूर यांचा 'लव्हयापा'; नव्या चित्रपटाच्या माध्यमातून येणार भेटीला, रिलीज डेट समोर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 09:07 IST2024-12-28T09:05:50+5:302024-12-28T09:07:59+5:30

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) मुलगा जुनैद खान (Junaid Khan) याने अलीकडेच 'महाराज' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं.

bollywood actor aamir khan son junaid khan and khushi kapoor romantic comedy film titled loveyapa release soon | जुनैद खान अन् खुशी कपूर यांचा 'लव्हयापा'; नव्या चित्रपटाच्या माध्यमातून येणार भेटीला, रिलीज डेट समोर 

जुनैद खान अन् खुशी कपूर यांचा 'लव्हयापा'; नव्या चित्रपटाच्या माध्यमातून येणार भेटीला, रिलीज डेट समोर 

Loveyapa Movie: बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) मुलगा जुनैद खान (Junaid Khan) याने अलीकडेच 'महाराज' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमातील अभिनयासाठी त्याचं सर्वत्र कौतुक करण्यात आलं. त्यानंतर आता जुनैद एका नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आमिर खान लाडका लेक या चित्रपटामध्ये श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूरसोबत (Khushi Kapoor) स्क्रिन शेअर करणार आहे. नुकतीच जुनैद-खुशी यांच्या थिएटरल डेब्यू फिल्मची रिलीज डेटही समोर आली आहे. अद्वैत चंदन या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असून 'लव्हयापा' असं चित्रपटाचं नाव आहे. 


दरम्यान, मुंबई आणि दिल्लीमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. फँटम स्टुडिओद्वारे सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यामध्ये लिहिलंय की, "सिच्युएशनशिप की रिलेशनशिप? लव्ह का सियाप्पा की लव्हयापा? येत्या ७ फेब्रुवारीला २०२५ हा चित्रपट थिएटमध्ये पाहा. " अशी पोस्ट शेअर करण्यात आली आहे. 

अशातच फॅटम स्टुडिओ आणि एजीएस एंटरटेन्मेंटकडून जुनैद खान आणि खूशी कपूर मुख्य भूमिकेत असलेल्या या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. लव्हयापा या रॉमकॉम चित्रपटातून ही फ्रेश जोडी रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सिनेरसिकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे. 'लव्हयापा' हा सिनेमा हा मॉडर्न युगातील प्रेमकहाणीवर आधारित आहे. मनाला भिडणारं कथानक, उत्कृष्ट अभिनय आणि मजेदार संगीतने या सगळ्या गोष्टीने परिपूर्ण असणारा हा सिनेमाआहे. शिवाय हा चित्रपट २०२२ साली आलेल्या तमिळ 'हिट लव्ह टुडे' चित्रपटाचा रिमेक असल्याचं म्हटलं जातंय. 

वर्कफ्रंट

जुनैद खानने 'महाराज' या चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. या सिनेमात अभिनेत्यासोबत शालिनी पांडे आणि जयदीप अहलावत असे तगडे कलाकार पाहायला मिळाले. त्याचबरोबर खुशी कपूर जोया अख्तर यांच्या 'द आर्चिज' चित्रपटात झळकली होती. 

Web Title: bollywood actor aamir khan son junaid khan and khushi kapoor romantic comedy film titled loveyapa release soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.